राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईमधील जे. जे. रुग्णालयामध्ये करोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला आहे. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास मुख्यमंत्र्यांनी करोनाची लस घेतली. यावेळी त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांचे पुत्र तसेच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे सुद्धा उपस्थित होते. करोना लसीसंदर्भातील संभ्रम दूर व्हावा या हेतूने उद्धव ठाकरेंनी करोनाची लस घेतली असून सर्वांनीच लसीकरणाच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं असा संदेश देण्यासाठी राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी लस घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी कोव्हिशिल्ड ही लस घेतल्याची माहिती समोर येत आहे. उद्धव ठाकरेंबरोबरच त्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनीही करोनाची लस घेतली आहे.

करोना लसीकरणासंदर्भातील संभ्रम दूर व्हावा आणि जास्तीत जास्त लोकांनी या लसीकरणामध्ये सहभागी व्हावे यासाठी राजकीय नेत्यांनी, सेलिब्रिटींनी आणि समाजातील प्रभावशाली व्यक्तींनी पुढाकार घेत लसीकरण केलं पाहिजे असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी पुढाकार घेत लसी टोचून घेतली आहे. आज उद्धव ठाकरेंनी आपल्या कुटुंबियांसोबत जे. जे. मध्ये जाऊन लस घेतली त्यावेळी डॉ. तात्याराव लहाने देखील उपस्थित होते. उद्धव यांच्यासोबतच त्यांच्या निकटवर्तीयांपैकी रश्मी ठाकरेंच्या आई मीनाताई पाटणकर यांनीही करोना लसीचा पहिला डोस घेतला. उद्धव यांनी लस घेतली तेव्हा ठाकरे कुटुंबियांबरोबरच  डॉ तात्याराव लहाने, आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, टास्क फोर्सचे डॉ शशांक जोशीही उपस्थित होते.

sharad pawar
बारामतीमधील नमो रोजगार मेळाव्याच्या निमंत्रणपत्रिकेत शरद पवार यांचे नाव; जिल्हा प्रशासनाकडून सुधारित निमंत्रणपत्रिका
Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस का म्हणाले, मी पुन्हा येईन…
cbi summoned akhilesh yadav in illegal mining case in uttar pradesh
अवैध खाण प्रकरण: अखिलेश यादव यांना सीबीआयचे समन्स, गुरुवारी हजर राहण्याचे निर्देश
cm eknath shinde appeal shiv sainiks
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खोटी स्वाक्षरी आणि शिक्के वापरले; मंत्रालयात खळबळ, गुन्हा दाखल

देशामध्ये १ मार्चपासून करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झालाय. तिसऱ्या टप्प्याअंतर्गत वय वर्षे ६० तसेच  ४५ वर्षे पूर्ण ते ६० वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी (कोमॉर्बिड) असणाऱ्या व्यक्तींचेही लसीकरण केलं जात आहे. पंतप्रधान मोदींप्रमाणे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी चेन्नईमध्ये, राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, सोम प्रकाश आदींनी लस घेतली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन लसीकरण सुरु झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी करोनाची लस घेतली.

देशात लसीकरणाचा पहिला टप्पा १६ जानेवारी रोजी सुरू झाला होता. पहिल्या टप्प्यात आघाडीवरील करोनायोद्धय़ांच्या लसीकरणासाठी सीरम संस्थेने उत्पादित केलेली ‘ऑक्सफर्ड’ची ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेक कंपनीची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लशींचा वापर करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.