मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ठाणे स्थानकावर एक प्रवासी ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात प्लॅटफॉर्मवरून लोकलखाली पडला, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकलखाली आलेला व्यक्ती गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. ज्या लोकलखाली हा व्यक्ती आला ती गाडी स्थानकातच २०-२५ मिनिटे थांबली आणि सर्व गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले.

आज सकाळी ठाणे स्थानकावर फलाट क्रमांक ४ जवळ ही घटना घडली. परिणामी, मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबईकडे येणारी वाहतूक १५ ते २० मिनिटं उशीराने सुरू आहे. तर, डाऊन मार्गावरील वाहतूक वेळेवर सुरू आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वाहतूक विस्कळीत झाल्याने मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.