मुंबईतील धारावीमधून आज एक थोडीशी दिलासा देणारी बातमी आहे. मुंबईत करोना व्हायरसचा फैलाव सुरु झाल्यापासून सातत्याने धारावीमध्ये रुग्ण सापडत आहेत. आजही धारावीमध्ये करोना व्हायरसचे १८ नवीन रुग्ण सापडले. पण मागच्या २४ तासात करोनामुळे धारावीत एकही मृत्यू झालेला नाही.

हीच त्यातल्या त्यात थोडीशी दिलासा देणारी बातमी आहे. धारावीमध्ये करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या १६३९ पर्यंत जाऊन पोहोचली आहे. मुंबईत करोना व्हायरसमुळे सर्वाधिक खराब स्थिती असलेल्या भागांमध्ये धारावीचा समावेश होतो. धारावी हा आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेला भाग आहे.

मंगळवारी धारावीत करोना व्हायरसचे ३८ रुग्ण सापडले होते. धारावीत करोनामुळे आतापर्यंत ६० जणांचा मृत्यू झाला आहे. धारावीची लोकसंख्या ६.५० लाख आहे.

Story img Loader