Heavy Rains in Mumbai: मागच्या काही दिवसांपासून दडी मारुन बसलेल्या मान्सूनच्या पावसाने शनिवारपासून राज्यात चांगलाच जोर पकडला आहे. मुंबई आणि कोकणात मुसळधार पाऊस कोसळत असून रविवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.

कुर्ला, सायन येथे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे आधीच तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकल ट्रेन १५ ते २० मिनिट उशिराने धावत आहेत. असाच पाऊस सुरु राहिला तर मुंबईत रेल्वे वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे.

हवामान विषयक अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेटने कोकण, गोवा आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवला आहे. मुंबईत पुढच्या १२ तासात मुसळधार पावसाचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.