महाराष्ट्रातील गुणी कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या आणि त्यांना ताऱ्यांच्या पंक्तीत नेऊन बसवणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत प्रवेश घेण्यासाठी अखेरचे सहा दिवस राहिले आहेत. स्पर्धेतील प्रवेशाची मुदत २५ सप्टेंबपर्यंतची आहे.

स्पर्धेच्या रंगमंचावर तावून सुलाखून निघालेले प्रतीक गंधे, निनाद गोरे, अनुजा मुळ्ये, श्रीकांत भगत आणि पवन ठाकरे आज चित्रपट व मालिकांमध्ये चमकत आहेत. यासारखी नामी संधी तुम्हालाही मिळू शकते. ‘लोकसत्ता लोकांकिका-२०१४’ स्पर्धेतील एकांकिकांमधील त्यांचा अभिनय गाजला.
आयरिस प्रॉडक्शन्स ही तर या स्पर्धेची टॅलेन्ट पार्टनरच. त्यांनी स्पर्धेतील या गुणवंतांना छोटय़ा पडद्यावर चमकण्याची संधी दिली. ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘पृथ्वी एडिफिस’ यांच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेसाठी रंगमंचही सज्ज झाला आहे.
२९ सप्टेंबरपासून राज्यभरात ही नाटय़धुमाळी सुरू होणार आहे. ‘झी मराठी नक्षत्र’ हे टेलिव्हिजन पार्टनर लाभले असून ‘अस्तित्व’ या संस्थेच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी ९३.५ रेड एफएम हे रेडिओ पार्टनर म्हणून काम पाहणार आहेत. ‘आयरिस प्रॉडक्शन्स’ हे ‘टॅलेंट पार्टनर’ आहेत. यंदा ‘स्टडी सर्कल’ही या स्पर्धेत ‘नॉलेज पार्टनर’ म्हणून सहभागी झाले आहेत.

नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, रत्नागिरी, पुणे, ठाणे आणि मुंबई या आठ केंद्रांवर महाविद्यालये स्पर्धेसाठीचा अर्ज सादर करू शकतात. अंतिम मुदत आहे शुक्रवार, २५ सप्टेंबर. विभाग, स्पर्धाकेंद्रे आणि दिनांक आदी माहितीसाठी भेट द्या : indianexpress-loksatta.go-vip.net/lokankika2015

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.