मुंबईमध्ये घरटी किमान एक मोटारसायकल आता सहज दिसून येते यामुळेच पाìकगची समस्या डोके वर काढणारच. यातूनच इमारतीखाली पाìकगचा प्रश्न निर्माण होतो. त्यावरुन मग ओघाने भांडणेही आलीच. करीरोडच्या विघ्नहर्ता सोसायटीजवळ तब्बल ३६ मोटारसायकल आणि दोन कार यांना आग लागण्यामागे पाìकगची भांडणे असल्याची माहिती उघडकीस आली आहे. काळाचौकी पोलिसांनी याप्रकरणी इमारतीतीलच दोन रहिवाशांना अटक केली असून गाडीला पाìकगसाठी जागा मिळत नसल्याने त्यांनी हे कृत्य केल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, मद्यधुंद अवस्थेत गाडय़ा जाळल्यानंतर दोघेही आपापल्या घरी जाऊन आपल्याला काही माहितीच नसल्याचे भासवत होते.

करीरोड येथील विघ्नहर्ता सोसायटी येथे २१ मार्चच्या पहाटे गाडय़ांना आग लागल्याचे कळताच सर्व रहिवासी धावत इमारती खाली आले. आपल्या घामाच्या कमाईतून विकत घेतलेली मोटारसायकल, कार जळताना पाहून सर्वाच्या डोळ्यांत आसवे दाटली होती. घटनेची माहिती मिळताच काळाचौकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एकूण ३६ मोटारसायकल आणि दोन कार या आगीत जळून भस्मसात झाल्या. वरिष्ठ पोलीस निरिक्षक दिलीप उगले यांनी या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कैलास भारती आणि राहुल कदम यांनी तपासाला सुरूवात केली होती. रहिवाशांच्या चौकशीत इमारतीतच राहणारया महेंद्र घाडी याची कारला पाìकगला जागा मिळत नसल्याने सतत भांडणे होत असल्याचे कळाले. व्यवसायाने चालक असलेल्या घाडीची चौकशी पोलिसांनी सुरूवात केली. जळीतकांडाच्या रात्री तुम्ही कुठे होता अशा प्रश्नांना घाडी उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. अखेर, पोलिसांच्या सखोल चौकशीअंती घाडीने आपणच गाडय़ा पेटवून दिल्याचे मान्य केले. चालक असलेला घाडी त्याची कार घेऊन रात्री उशीरा इमारतीत येत असे, पण त्यापूर्वीच इतर रहिवासी आपल्या गाडय़ा उभ्या करत असल्याने आपल्या गाडीला पाìकगला जागा मिळत नसल्याने घाडीचा नेहमी संताप होत असे. रविवारी रात्री उशीरा मद्यधुंद अवस्थेत आलेल्या घाडीने गाडय़ा जाळून पाìकगचा प्रश्न सोडविण्याचे ठरवले. मोटारसायकलची पेट्रोलचा पाईप तोडून त्याला आग लावण्याचा प्रयत्न त्याने केला, पण आग लागली नाही अखेर त्याने वायर जवळ आणली आणि त्यातून ठिणगी निघाली, यामुळे पडलेल्या पेट्रोलने पेट घेतला आणि क्षणार्धात गाड्या जळू लागल्या. आगीत आपलीही गाडी जळत असल्याचे लक्षात आल्यावर घाडीने ती काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात अपयश आले. अखेर, भेदरलेला घाडी आपल्या घरी जाऊन काही घडलेच नसल्याच्या थाटात झोपला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक दिलीप उगले यांनी दिली. हे सर्व घडत असताना घाडीचा एक मित्रही तिथे होता, पोलिसांनी या दोघांनाही अटक केले. मात्र, जामिनपात्र गुन्हा असल्याने दोघांचीही लगेचच सुटका झाली. गाडय़ा जळाल्यामुळे झालेले नुकसान कोण भरुन देणार हा प्रश्न आता रहिवासी विचारत आहेत.