पॉर्न फिल्म्स आणि पॉर्न अॅप्स प्रकरणात उद्योगपती राज कुंद्रा यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात आता अभिनेत्री शिल्पा शेट्टीही पोलिसांच्या रडारवर आली आहे. मुंबई पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी शिल्पा शेट्टीच्या जुहू येथील बंगल्याची झाडाझडती घेतली. तसेच शिल्पाची सहा तास चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शिल्पा शेट्टीचाही porn films प्रकरणात सहभाग आहे का? शिल्पाला यातून आर्थिक लाभ झाला का? या अनुषंगाने पोलिसांकडून चौकशी करण्यात आली.

पॉर्न फिल्म्स निर्मिती आणि प्रदर्शन केल्याप्रकरणात मुंबई पोलिसांनी राज कुंद्रा यांना अटक केलेली आहे. या प्रकरणात कुंद्रा यांना २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्वांची पोलिसांकडून चौकशी केली जात असून, राज कुंद्रा यांची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचाही जबाब शुक्रवारी नोंदवण्यात आला.

हेही वाचा- राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणात शिल्पा शेट्टी सुद्धा…? पोलिसांनी दिलं हे उत्तर

राज कुंद्रा यांचा पॉर्न फिल्म्स निर्मितीशी संबंध असल्याची माहिती शिल्पाला होती का? अटकेत असलेला उद्योजक आणि शिल्पाचा पती राज कुंद्रा यांच्या अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात तिचाही सहभाग आहे का, याची चौकशी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून करण्यात आली. शिल्पाच्या जुहूमधील आलिशान घरात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शुक्रवारी संध्याकाळी छापा टाकला. राज कुंद्राला घेऊन मुंबई त्यांच्या घरी गेले होते. शिल्पाचा जबाब आणि धाडसत्र संपल्यानंतर सहा तासांनी पोलिसांचे पथक राज कुंद्रासह घराबाहेर पडले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पॉर्न फिल्म्स निर्मितीमुळे चर्चेत आलेल्या विआन कंपनीच्या संचालकपदी शिल्पा शेट्टी होती. मात्र, तिने नंतर विआन उद्योगाच्या संचालक पदाचा राजीनामा दिला होता. विआन कंपनीने निर्मिती आणि विक्री केलेल्या पॉर्न फिल्म्समधून शिल्पा शेट्टीलाहा आर्थिक लाभ झाला का याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.

हेही वाचा- “शिल्पा शेट्टीला होती राज कुंद्राच्या पॉर्न रॅकेटची माहिती, तिचीही चौकशी करा”

विआन कंपनीच्या संचालक पदावर शिल्पा शेट्टी किती काळ होती? तिला अश्लील चित्रपट निर्मितीबाबत काही कल्पना होती का? या रॅकेटचा कारभार विआन कंपनीच्या ऑफिस मधून चालत असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे २०२० मध्ये तिने विआन कंपनीच्या डायरेक्टर पदाचा राजीनामा का दिला होता? या संदर्भात शिल्पाची चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून शिल्पा शेट्टीच्या बँक खात्यांचाही तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर विआन कंपनीच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यात आलेले आहेत. ते कुणी डिलीट केले याची चौकशी पोलिसांकडून केली जाणार असल्याचं वृत्त आहे.