डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह या ठिकाणी मंगळवारी संध्याकाळी अज्ञातांनी तोडफोड केली. राजगृह या ठिकाणी असलेला सीसीटीव्ही कॅमेरा आणि झाडांच्या कुंड्या यांची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. राज्यातील नेतेमंडळीनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी राजगृहाच्या आवारात झालेल्या या तोडफोडीचा निषेध केला आहे. दादर येथील राजगृह हे आंबेडकरांनीच उभारलेलं आहे. ही वास्तू म्हणजे आंबेडकरांच्या ग्रथंसंपदेबरोबरच त्यांच्याशी संबंधित अनेक आठवणींना उजाळा देणारी वास्तू आहे. याचसंदर्भात लोकसत्ता डॉट कॉमने २०१८ साली बाबासाहेबांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त याच राजगृहाचे महत्व सांगणारा खास व्हिडिओ तयार केला होता. चला तर मग जाणून घेऊयात काय आहे या वास्तूचे महत्व…
या व्हिडिओवरुन ही वास्तू किती महत्वाची आहे आणि त्याचा ऐतिहासिक वारसा किती मोठा आहे याचा अंदाज तुम्हाला नक्कीच आला असेल.