शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर खरमरीत टीका करणारी पोस्टर्स भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर टाकण्यात आल्यानंतर लगेचच शिवसैनिकांनीही थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारी पोस्टर्स प्रसिद्ध केली आहेत. शिवसेनेने या पोस्टर्सच्या माध्यमातून भाजपला आपले उपकार न विसरण्याचा सल्ला दिला आहे. अत्यंत शेलक्या शब्दांमध्ये मोदी यांच्यावर या पोस्टर्समधून टीका करण्यात आली आहे.
मोदी यांच्या विदेश दौऱ्यावर टीका करताना ‘विदेशात खूप झालं, जरा देशात बघा’ असा सल्ला देण्यात आला आहे. तर ज्या अच्छे दिनाचे स्वप्न भाजपकडून सर्वसामान्यांना दाखवण्यात येत आहे. त्यावरही शिवसैनिकांनी प्रहार केला असून, ‘अच्छे बिच्छे दिन काही नाही, लोकच उत्तर देतील यांना आम्हाला घाई नाही’ असे एका पोस्टरवरील मजकुरात लिहिण्यात आला आहे. या पोस्टरवर मोदी यांची व्यंगचित्रे रेखाटण्यात आली आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jun 2016 रोजी प्रकाशित
भाजपच्या पोस्टर्संना शिवसैनिकांचे प्रत्युत्तर
शिवसेनेने या पोस्टर्सच्या माध्यमातून भाजपला आपले उपकार न विसरण्याचा सल्ला दिला आहे
Written by लोकसत्ता टीम

First published on: 10-06-2016 at 19:22 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena posters against bjp