बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांच्या वकिलाने कुंद्रा यांना ज्या अश्लील चित्रपटांच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली ते चित्रपट पॉर्नोग्राफी प्रकारामध्ये मोडत असल्याचा युक्तीवाद केलाय. कुंद्रा यांचे वकील आबाद पोंडा यांनी न्यायालयासमोर युक्तीवाद करताना सोमवारी मुंबई पोलिसांनी केलेल्या अटकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची म्हणजेच पॉर्नची निर्मिती करून अ‍ॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणामध्ये कुंद्रा मुख्य आरोपी असल्याचा दावा पोलिसांनी या कारवाईचं समर्थन करताना केला होता. त्यावर राज कुंद्रा यांनी पोंडा यांच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली. आपण निर्माण केलेल्या कंटेटला कायदेशीर भाषेत पॉर्न म्हणता येणार नाही. हा कंटेट अश्लील प्रकारामध्ये मोडतो असा युक्तीवाद कुंद्रांच्या वकिलांनी केलाय.

पोडा यांनी राज यांच्यावर झालेल्या कारवाईमध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत कलम ६७ अ चुकीच्या पद्धतीने लावण्यात आल्याचा दावा केलाय. भारतीय दंडसंहितेनुसार अश्लील साहित्य पाठवण्यासंदर्भातील गुन्ह्यांमध्ये हा कलम लावला जातो. प्रत्यक्ष शरीरसंबंध ठेवताना (संभोग करतानाचे) साहित्य असल्यास त्याला कायदेशीर भाषेमध्ये पॉर्न असं म्हणतात. इतर सर्व साहित्याला अश्लील असं म्हणता येईल, असा युक्तीवाद वकिलांनी केला.

Left to right) Vijay Dev, Anurag Agarwal and Vikram Dev Dutt. (Express Archives)
चंदीगडच्या IAS अधिकाऱ्यांनी पॅरीसमध्ये केली जिवाची मुंबई, ऑडिट रिपोर्टमध्ये ठपका
Supreme Court Gyanvapi mosque
ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली
Morbi bridge
१३५ जणांचा जीव घेणाऱ्या मोरबी पूल दुर्घटनेतील आरोपीला अखेर जामीन, पण कोर्टाने घातल्या ‘या’ अटी
Case of Allegedly Inciting Speech Demand to file case against Nitesh Rane and Geeta Jain
कथित प्रक्षोभक भाषण केल्याचे प्रकरण : नितेश राणे, गीता जैन यांच्यावर गुन्हा दाखल करा

नक्की पाहा >> कंडक्टरचा मुलगा, हिरे व्यापारी, शिल्पा शेट्टीशी लग्न ते पॉर्न प्रकरण; राज कुंद्रांबद्दलच्या ३० खास गोष्टी

“माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत असणारे कलम हे आयपीसीच्या कलमांप्रमाणे नसतात. मात्र इथे पोलिसांनी तेच केलं आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यामधील कलम ६७ अ हे लैंगिक कृत्यांसंदर्भातील आहे. प्रत्यक्ष संभोगालाच कायद्यानुसार पॉर्न म्हटलं जातं. इतर सर्व प्रकारच्या कंटेंट अश्लील प्रकरणात मोडतो,” असं पोंडा यांनी म्हटलं. “सध्या वेबसिरीज जो अश्लील कंटेंट निर्माण करतात पोलीस त्याच्याच मागावर आहेत. मात्र याला पॉर्न म्हणता येणार नाही. या प्रकरणामध्ये दोन व्यक्तींनी प्रत्यक्षात शरीरसंबंध ठेवल्याचा उल्लेख आहे. जर प्रत्यक्षात शरीरसंबंध ठेवले नसतील तर त्याला पॉर्न म्हणता येणार नाही,” असा युक्तीवाद पोंडा यांनी केला.

नक्की वाचा >> “Porn Vs Prostitution वर बोलूयात, कॅमेरासमोरच्या सेक्ससाठी…”; राज कुंद्रांचं ‘ते’ ट्विट व्हायरल

या प्रकरणामध्ये राज कुंद्रा यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. कुंद्रा यांनी अश्लील पॉर्नोग्राफिक व्हिडीओंचं प्रसारण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हॉटशॉर्टस या अॅपच्या माध्यमातून त्यांनी हे काम केल्याचं मुंबई पोलिसांनी न्यायालयाने सांगितलं. न्यायालयाने कुंद्रा यांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  “पोलीस कोठडी अपवादात्मक परिस्थितीत देण्यात यावी. पोलीस कोठडी हा आदर्श पर्याय नाही. अटक केल्याशिवाय तपास पूर्ण होऊ शकत नसेल तरच अटक करण्यात यावी. या प्रकरणामध्ये आरोप असणाऱ्याला अटक करुन तपासामध्ये सहभागी करुन घेण्यात आलं आहे. ही अटक कायद्यानुसार झालेली नाही,” असं पोंडा यांनी राज यांची बाजू मांडताना म्हटलं.

नक्की वाचा >> पॉर्न सिनेमा प्रकरण : कुंद्रांच्या अटकेनंतरचे Google Search पाहून व्हाल थक्क; महाराष्ट्र आघाडीवर

पोलिसांनी कुंद्रांविरोधात पुरेसे पुरावे असल्याचं म्हटलं आहे. तसेच या प्रकरणाच्या आतापर्यंतच्या तपासामध्ये शिल्पा शेट्टीचा यामध्ये काहीच सहभाग नसल्याचं पोलिसांनी न्यायालया सांगितलं. या प्रकरणामध्ये आतापर्यंत ११ जणांना अटक झाली आहे.