लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : पंजाबमध्ये कट रचून दहशतवादी कारवाया केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) जितंदर सिंह ऊर्फ ज्योति याला सोमवारी अटक केली होती. पण मुंबईत अटक होण्यापूर्वी तो दिल्ली व लखनऊ येथे वास्तव्याला होता. जुलै महिन्यात त्याचे नाव शस्त्रास्त्र प्रकरणात आल्यानंतर त्याने मुंबई गाठल्याचे तपासात उघड झाले आहे.

Possibility of protection of benefits for teachers in aided schools
…तर अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या लाभांना संरक्षण मिळणार?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Chandrakant Patil announced Recruitment in universities in state will be done through universities instead of MPSC
राज्यातील विद्यापीठांतील भरती एमपीएससीऐवजी विद्यापीठांतर्गत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा
Ratnagiri, Shivaji Maharaj, historical treasure,
रत्नागिरी : राजापुरातील रायपाटण येथे सापडला शिवकालीन ऐतिहासिक ठेवा
gross state income maharashtra
महाराष्ट्राची दशकभरात पीछेहाट, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचा निष्कर्ष; सकल उत्पन्नात राज्याचा वाटा घटला
In Bhosari assembly former corporator Ravi Landge supported NCP candidate Ajit Gavane
भोसरी विधानसभा: बंडखोर रवी लांडगे आणि अजित गव्हाणे यांचं मनोमिलन भोसरीतील बंडखोरी शमली, रवी लांडगे उद्या उमेदवारी अर्ज माघारी घेणार
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Manoj Jarange News
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा

आरोपी मूळचा पंजाबमधील गुरूदासपूर येथील रहिवासी असून खलिस्तान दहशतवादी लखबीर सिंह ऊर्फ लांडा आणि गँगस्टर बचितर सिंह ऊर्फ पवित्र बाटला यांच्या विश्वासू साथीदार आहे. आरोपी बब्बर खालसासाठी शस्त्रास्त्रे वितरणाचे काम करीत होता. पण ओळख लपवण्यासाठी सुरूवातीला दिल्ली व त्यानंतर लखनऊमध्ये क्रेन ऑपरेटर म्हणून काम करायचा. याप्रकरणी जुलै, २०२४ मध्ये बलजीत सिंह ऊर्फ राणा भाईला अटक झाली होती. तेव्हा आरोपी जतिंदरचा याप्रकरणातील सहभाग उघड झाला होता. त्यानंतर त्याने मुंबई गाठली व तो मानखुर्द परिसरात राहू लागला. यापूर्वीही २००८ मध्ये त्याने मुंबईत क्रेन ऑपरेटर म्हणून काम केले आहे. त्यामुळेच शस्त्रास्त्र प्रकरणात त्याचे नाव आल्यानंतर त्याने मुंबई गाठली. यापूर्वी त्याने मुंबईत काम केल्यामुळे मुंबईतील विविध परिसराची माहिती होती, असे चौकशीत समजले आहे.

आणखी वाचा-गतिमंद मुलीवरील बलात्कार प्रकरण : ७३ वर्षांच्या दोषसिद्ध आरोपीला जामीन नाहीच

एनआयएच्या तपासानुसार, जतिंदर हा बंदी घातलेल्या बब्बर खालसा (आंतरराष्ट्रीय) या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे. अटक आरोपी जतिंदर हा पवित्र बाटला याचा विश्वासू मानला जातो. तो संघटनेसाठी पंजाबमध्ये शस्त्रांचे वितरण करण्याचे काम करीत होता, असा आरोप आहे. जतिंदर सिंहने मध्य प्रदेशातून शस्त्र पुरवठादार बलजित सिंह ऊर्फ राणाभाईकडून दहा पिस्तुले आणली होती. ती पंजाबमधील संघटनेशी संबंधित व्यक्तींना पुरवली होती. त्यामुळे त्याची अटक देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.

Story img Loader