मुंबई : बनावट बँक हमीच्या साह्याने खासगी कंपनीची एक कोटी ७ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी खासगी बँकेच्या कर्मचाऱ्यासह ओरिसातील पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस अधिक तपास करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नरिमन पॉईंट येथील तक्रारदार व्यावसायिक मणिलाल पी. नारायणन (५१) यांच्या तक्रारीनुसार, एका खासगी कंपनीचे संचालक आनंद वर्मा, अमरजीत राठी, प्रतिनिधी अजित साहू, लेखा परीक्षक सुंदर्शन बाल आणि त्यांना मदत करणारे खासगी बँकचे कर्मचारी साबु नायर यांच्यासह अन्य व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचही जण ओरिसातील आहे. यावर्षी ३ जानेवारी ते ९ एप्रिलदरम्यान ही फसवणूक झाली आहे. पाचही जणांनी संगनमत करून स्वतःची खोटी ओळख निर्माण करून मणिलाल यांचा विश्वास संपादन केला. ठाण्यामधील बँकेतील सव्वा कोटीची बनावट बँक हमी तयार करून मणिलाल यांच्याकडून डांबर खरेदी केले. तसेच व्यवहारासाठी बनावट ई-मेलचा वापर केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. बँक हमीची बनावट कागदपत्रे तयार केल्याचे चौकशीत स्पष्ट होताच त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलीस या कागदपत्रांच्या आधारे तपास करीत आहे.