विनायक डिगे
मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये डोळे येण्याच्या रुग्णांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. त्यानुसार महानगरपालिका व सार्वजनिक आरोग्य विभागाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र १० ते २० ऑगस्ट या ११ दिवसांत राज्यात १ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना डोळे येणे या आजाराची लागण झाली आहे. त्यात पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.
ऑगस्ट सुरू झाल्यापासून राज्यामध्ये डोळे येण्याचे रुग्ण सापडू लागले. राज्यात आतापर्यंत ४ लाख ६२ हजार ६ रुग्ण सापडले आहेत. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात डोळे येण्याचे सर्वाधिक ४५ हजार ८६५ रुग्ण सापडले आहेत. राज्यात डोळे येण्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. १० ते २० ऑगस्ट या ११ दिवसांमध्ये राज्यामध्ये तब्बल १ लाख ४ हजार ७४१ जणांना डोळे येण्याच्या साथीची लागण झाली. ११ ऑगस्टला सर्वाधिक ३३ हजार ७३ रुग्ण सापडले. त्याचप्रमाणे १२ ऑगस्टला ९ हजार २६७ रुग्ण, १७ ऑगस्टला २० हजार २८७ रुग्ण, १८ ऑगस्टला १४ हजार १७२ रुग्ण आणि १९ ऑगस्टला ५ हजार ६२६ रुग्णांची भर पडली आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये साथीच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये मागील ११ दिवसांत ९७८८ डोळे येण्याचे रुग्ण सापडले आहेत. त्याखालोखाल अमरावतीमध्ये ६,७२४, जळगावमध्ये ५,९३०, नांदेड ५,५४८, चंद्रपूर ५,२९२, परभणी ४,६२० इतके रुग्ण सापडले आहेत. राज्यात सर्वाधिक रुग्णनोंद असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात ११ दिवसांत फक्त १ हजार ४६७ रुग्ण सापडले आहेत. तसेच उल्हासनगर महापालिका क्षेत्रात सर्वात कमी १६ रुग्ण सापडले आहेत.
११ दिवसांतील रुग्णसंख्या
१० ऑगस्ट ३,५७,२६५
११ ऑगस्ट ३,९०,३३८
१२ ऑगस्ट ३,९९,६०५
१३ ऑगस्ट ४,०१, ७२१
१६ ऑगस्ट ४,२०,९१३
१७ ऑगस्ट ४,४१,२००
१८ ऑगस्ट ४,५५,३७२
१९ ऑगस्ट ४,६०,९९८
२० ऑगस्ट ४,६२,००६