लोकसत्ता टीम

मुंबई : गणेशोत्सव अवघ्या आठ दिवसांवर आलेला असताना तब्बल ४८.६७ टक्के म्हणजे एक हजार ३२२ मंडळांना मुंबई महानगरपालिकेकडून मंडप परवाना मिळू शकलेला नाही. मात्र गणेशोत्सव जवळ आल्यामुळे यापैकी बहुतांश मंडळांनी विनापरवाना मंडप उभारून सजावट सुरू केली आहे. तर काही मंडळांनी उंच गणेशमूर्ती मंडपस्थळी विराजमान करून सजावट सुरू केली आहे. ऑगस्ट महिन्यात आलेली सुट्टी आणि माहिती आणि तंत्रज्ञान विभागातील तांत्रिक अडचणींमुळे मंडप परवाना वेळीच मिळू शकलेला नाही.

sale of illegal liquor pune, illegal liquor pune, pune,
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा दारू विक्री प्रकरणी १२६७ गुन्हे दाखल
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
nashik vidhan sabha
नाशिक: एकाच दिवसात ३४९ गुन्हेगार हद्दपार
Biggest Stock Market Crashes in India
मंदीच्या सावटाने बाजार गडगडला! अवघ्या दीड महिन्यात सेन्सेक्समध्ये ८,२८७ ने घट
Mega Housing Lottery application process, entension, CIDCO
सिडकोच्या २६ हजारांच्या महागृहनिर्माण सोडत प्रक्रियेला महिन्याभराची मुदतवाढ
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…

मुंबईमधील विविध परिसरातील रस्ते, पदपथ, मैदान अथवा सार्वजनिक ठिकाणी मोकळ्या जागेमध्ये मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. काही वर्षांपूर्वी गणेशोत्सवासाठी रस्ते, पदपथांवर उभारण्यात येणाऱ्या मंडपांमुळे वाहतूक आणि पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत होता. अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार रस्ते, पदपथांवरील मंडपांसाठी कडक नियमावली तयार करण्यात आली. वाहतूक आणि पादचाऱ्यांना कोणताही अडथळा होणार नाही अशा पद्धतीने मंडप उभारण्यास परवानगी देण्यात येत आहे. सदर मंपडाचा आराखडा, मंडपाचे आकारमान, आत आणि बाहेर पडण्याचे प्रवेशद्वार, गर्दीचे नियोजन आदींबाबत कडक नियम करण्यात आले आहेत. तसेच मंडपांसाठी महापालिका, स्थानिक पोलीस ठाणे, अग्निशमन दल आणि वाहतूक पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

आणखी वाचा-सोमवारी अंधेरी, जोगेश्वरीत अर्धा दिवस पाणीपुरवठा बंद

दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महानगरपालिकेकडून मंडप परवाना घ्यावा लागतो. पूर्वी मंडप परवान्यासाठी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना स्थानिक पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस, अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी संबंधित कार्यालयांमध्ये खेटे घालावे लागत होते. मात्र या पद्धतीत बदल करून महापालिकेने मंडप परवान्यासाठी एक खिडकी योजना सुरू केली. तसेच महापालिकेने मंडप परवाने ऑनलाईन पद्धतीने देण्यास सुरुवात केली. त्यामुळे मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा बराचसा त्रास कमी झाला आहे.

यंदा महापालिकेकडे मंडप परवान्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तीन हजार २०५ अर्ज केले होते. छाननीअंती त्यामध्ये ४३२ अर्ज दुबार करण्यात आल्याचे निदर्शनास आले. उर्वरित दोन हजार ७७३ अर्जांपैकी ४८.६७ टक्के म्हणजे एक हजार ४५१ मंडळांना ३० ऑगस्टपर्यंत मंडप परवाना देण्यात आला आहे. उर्वरित एक हजार ३२२ मंडळे मंडप परवान्याच्या प्रतीक्षेत आहेत.

आणखी वाचा-जुन्या चित्रपटांचे पुन:प्रदर्शन; नवीन चित्रपट नसल्याने चार जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित

दरवर्षी मुंबईमध्ये मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. मुंबईत साधारण १२ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून साधारण एक-दोन महिने आधी गणेशोत्सवाची तयारी सुरू होते. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका, मंडप, सजावट, गणेशोत्सव काळातील कार्यक्रम आदींचे नियोजन करण्यात येते. बहुसंख्य मंडळांचा सजावटीवर, चलचित्राच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यावर कल असतो. त्याच्या पूर्वतयारीसाठी गणेशोत्सवापूर्वी मंडप उभारणे आवश्यक असते. परंतु महापालिकेकडून अद्याप मंडप परवाना न मिळाल्याने काही मंडळांना मंडप उभारून गणेशोत्सवाची तयारी सुरू करावी लागली आहे.

ऑगस्ट महिन्यात उत्सवांमुळे कर्मचाऱ्यांना रजा होती. तसेच महापालिकेच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागातील त्रुटीमुळे मंडप परवान्याची प्रक्रिया झटपट होऊ शकली नाही. कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या दिवशी कार्यालयात बोलावून मंडप परवान्याच्या कामाला गती द्यावी. त्याबदल्यात कर्मचाऱ्यांना नंतर रजा द्यावी. -ॲड. नरेश दहिबावकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती

मुंबई महानगरपालिकेच्या काही विभाग कार्यालयांमध्ये मंडप परवाना देण्याचे काम संथगतीने सुरू आहे. महापालिकेचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना करीत आहेत. मात्र कर्मचाऱ्यांकडून मंडप परवान्याचे जलद काम होत नाही. या कामाला वेग देण्याची गरज आहे. -सुरेश सरनौबत, प्रमुख कार्यवाह, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ