महसूल गुप्तचर संचालनालयाने शनिवारी जळगाव जिल्ह्यातील एका गोदामावर छापा टाकून बेकायदेशीरपणे तयार करण्यात आलेल्या केटामाईन या औषधाचा १ हजार १७५ किलोचा साठा जप्त केला. या प्रकरणी विकास पुरी यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या केटामाईनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत ११८ कोटी रुपये इतकी आहे.
महसूल गुप्तचर संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक पी. के. दास यांनी सांगितले की, देशाच्या पश्चिम विभाग संचालनालयातर्फे करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. जळगाव येथे असलेल्या रुक्मा इंडस्ट्रीज्वर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. रुक्मा इंडस्ट्रीकडे या औषधाचे उत्पादन करण्याचा परवाना नसतानाही तेथे उत्पादन केले जात होते.
विकास पुरी याला शनिवारी पवई येथे अटक करण्यात आली असून त्याच्या घरातून १ कोटी २ लाख रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली असल्याचे समजते. पुरी याने औषधविज्ञानात एम.टेक केले आहे. विक्रोळी आणि रत्नागिरी येथे पुरी याच्या औषध आणि रसायन निर्मिती कंपन्याही आहेत.
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत १ टन केटामाईन जप्त
महसूल गुप्तचर संचालनालयाने शनिवारी जळगाव जिल्ह्यातील एका गोदामावर छापा टाकून बेकायदेशीरपणे तयार करण्यात आलेल्या
First published on: 15-12-2013 at 04:00 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1 tone ketamine seized tax revenue department action