मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या ब्रिटिशकालीन मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी तज्ज्ञ मंडळी जलाशयाची अंतर्गत पाहणी करणार आहेत. तज्ज्ञांची समिती मलबार हिल जलाशयातील कप्पा क्रमांक १ ची अंतर्गत पाहणी करणार असून जलाशयाचा कप्पा क्रमांक १ पूर्णपणे रिक्त करण्यात येणार आहे. परिणामी, दक्षिण मुंबईतील महानगरपालिकेच्या ‘ए’, ‘सी’, ‘डी’ आणि ‘जी दक्षिण’ विभाग कार्यालयांच्या हद्दीतील काही भागात १८ डिसेंबर रोजी १० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> अंधेरीतील जलवाहिनी प्रकरण : नोटीस बजावल्यानंतरही कंत्राटदाराकडून प्रतिसाद नाही

The work on six water tanks of Pune Municipal Corporation is still not complete Pune print news
सहा टाक्या, तरी पाणी मिळेना! पुण्यातील प्रकार
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Water supply to Ulhasnagar Ambernath Badlapur closed for 24 hours
बारवीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात दुरूस्ती; उल्हासनगरसह अंबरनाथ, बदलापुरातील पाणी पुरवठा २४ तास बंद
Borivali air, Air pollution Mumbai, Air pollution Borivali,
बोरिवलीची हवा ‘अतिवाईट’, मुंबईत हवा प्रदूषणाचे सत्र सुरूच
Water supply to Kalyan Dombivli cities to be cut off for 18 hours on Thursday
कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा गुरुवारी अठरा तास बंद
Thane district water, MIDC, MIDC water scheme ,
ठाणे जिल्ह्याचे पाणी महागणार ? एमआयडीसीची पाणी योजना तोट्यात, दर वाढवण्याच्या हालचाली
khambataki ghat tunnel work loksatta news
खंबाटकी घाटातील नवीन बोगदा अंतिम टप्प्यात, पुणे – बंगळूरू महामार्गाचे दळणवळण होणार गतिमान
nashik Malegaon liquor marathi news
मालेगावजवळ बनावट मद्यनिर्मिती कारखान्यावर छापा, ७० लाखांचा ऐवज जप्त

मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणी प्रकल्पानंतर जलाशयाची क्षमता १५० दशलक्ष लिटरवरून १९० दशलक्ष लिटरपर्यंत वाढविण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. मात्र, या कामादरम्यान मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल होणार असल्याचे समजताच संबंधित परिसरातील नागरिक व पर्यावरणप्रेमींनी या प्रकल्पाला विरोध करायला सुरुवात केली. त्यामुळे महानगरपालिकेने योग्य कार्यपद्धती सुचविण्यासाठी आयआयटी पवईचे प्राध्यापक, स्थानिक तज्ज्ञ नागरिक, महानगरपालिका अधिकारी यांचा समावेश असलेल्या तज्ज्ञ समितीची स्थापना केली. ही समिती टप्प्याटप्प्याने मलबार जलाशयाची पाहणी करणार आहे. या पाहणीचा पहिला टप्पा ७ डिसेंबर रोजी पूर्ण झाला होता. तज्ज्ञ समितीमधील सदस्य १८ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत जलाशयाची अंतर्गत पाहणी करणार आहेत. त्यामुळे मलबार हिल व आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या महानगरपालिकेच्या ‘ए’, ‘सी’, ‘डी’ आणि ‘जी दक्षिण’ विभाग कार्यालयांच्या अखत्यारितील विविध विभागांमध्ये १८ डिसेंबर रोजी १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. तसेच आवश्यकता भासल्यास जलाशयातील पाणीपातळी लक्षात घेऊन विभागवार पाणीपुरवठ्याच्या वेळेत बदल करण्यात येणार आहे. पाणीकपातीच्या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

Story img Loader