मुंबई : गेल्या सहा दिवसांपासून मुंबईत सुरू असलेली ५ टक्के पाणीकपात आता दुप्पट करण्यात आली असून बुधवारपासून मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील जलसाठा ६ टक्क्यांवर आला असून मुंबईकर आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. महापालिकेने ५ टक्के पाणीकपात लागू केल्यानंतर मुंबईत अनेक ठिकाणी पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. त्यातच आता पालिकेने १० टक्के पाणी कपाती लागू केल्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न तीव्र होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> ४७ कोटींच्या अपहाराप्रकरणी १२ जणांविरोधात गुन्हा दाखल; आर्थिक गुन्हे शाखा करतेय तपास

world heart day kem hospital success in saving 189 patients life under stemi project
जागतिक हृदय दिन : केईएम रुग्णालयात स्टेमी प्रकल्पांतर्गत १८९ रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Seven million cubic meters of water from Ulhas River is reserved for Ambernath and Badlapur
बदलापूर, अंबरनाथला मिळणार अतिरिक्त पाणी उल्हास नदीतून आरक्षण मंजूर, योजना मार्गी लागणार
no water supply tomorrow in some parts of Thane city
ठाण्याच्या काही भागात उद्या पाणी नाही
Mumbai currey road water supply marathi news
मुंबई: करी रोड आणि आसपासच्या परिसरात २७ सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा बंद, पाणी काटकसरीने वापरण्याचे महानगरपालिकेचे आवाहन
park created through afforestation in Marol will open for citizens soon
साडेतीन एकरांत शहरी जंगल! मरोळमध्ये वनीकरणातून साकारलेले उद्यान नागरिकांसाठी लवकरच खुले
panvel water latest marathi news
पनवेलमधील पाणी पुरवठा बंद
Executive Director of Konkan Irrigation Development Corporation approved two year plan to supply 500 million liters of daily water
भिरा’च्या पाणी प्रस्तावाला गती,शासन मंजुरीनंतर पनवेल महापालिकेचा ३४०० कोटींचा खर्च

मुंबईकरांना ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून दररोज ३९०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. या सातही धरणांची पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतकी आहे. मात्र, सध्या या धरणांमध्ये मिळून केवळ ९८ हजार १८२ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपल्बध आहे. ऊर्ध्व वैतरणा धरणातील वापरायोग्य पाणीसाठा ० टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे, या धरणातून आता पाणीपुरवठा केला जात नाही. मोडकसागर धरणात १५.६५ टक्के, तानसामध्ये २५.२० टक्के, मध्य वैतरणामध्ये ९.२० टक्के, विहारमध्ये १९.४ टक्के, तुळशीमध्ये २७.२४ टक्के आणि भातसामध्ये केवळ २.२६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. परिणामी, या सातही धरणांचा एकूण पाणीसाठा ६.७८ टक्क्यांवर आला आहे. गेल्यावर्षी पावसाने ओढ दिल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. धरणामध्ये उपलब्ध असणाऱ्या पाणीसाठ्याचा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी पालिका प्रशासनाने ३० मेपासून ५ टक्के पाणीकपात लागू केली आहे. पालिकेने मुंबईत बुधवारपासून १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. मात्र, या पाणीकपातीमुळे अनेक ठिकाणी नागरिकांना प्रचंड पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. झोपडपट्टी परिसरात एका नळाद्वारे चार ते पाच घरांमध्ये पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, पाणीकपातीमुळे अनेकांना पुरेसे पाणी मिळत नाही. परिणामी, पाण्यावरून नागरिकांमध्ये वाद होवू लागले आहेत. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार मुंबईत लवकरच पावसाचे आगमन होईल आणि मुंबईकरांना दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा >>> अंधेरीतील गोपाळकृष्ण गोखले पूल – सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाची जोडणी अंतिम टप्प्यात, महानगरपालिका आयुक्तांनी केली पाहणी

उपलब्ध पाणीसाठ्यावर पालिका प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून दररोज नियोजनपूर्वक पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच, नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे. समाधानकारक पर्जन्यमान होऊन धरणांतील पाणीसाठ्यात सुधारणा होईपर्यंत ही पाणीकपात लागू ठेवण्याचा पालिका प्रशासनाचा मानस आहे.

धरणातील पाणीसाठा

वर्ष –       उपलब्ध पाणीसाठा

२०२४ – ९८ हजार १८२ दशलक्ष लिटर

२०२३ – १ लाख ६७ हजार ५४९ दशलक्ष लिटर २०२२ – २ लाख २९ हजार ८१ दशलक्ष लिटर