मुंबई : शहर आणि पूर्व उपनगरांत गुरुवारपासून दोन दिवस दहा टक्के पाणीकपात केली जाणार आहे. ९ मार्च सकाळी १० वाजल्यापासून ११ मार्च सकाळी १० वाजेपर्यंत ही पाणीकपात राहणार आहे. ठाणे येथील कोपरी पुलाजवळ ठाणे महापलिकेतर्फे नवीन पुलाचे काम सुरू असताना मुंबई महापालिकेच्या २,३४५ मिलीमीटर व्यासाच्या ‘मुंबई २’ जलवाहिनीस हानी पोहोचून पाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आले. या वाहिनीच्या दुरुस्तीचे काम गुरुवारी ९ मार्च रोजी सकाळी १०पासून हाती घेतले जाणार आहे. हे काम शनिवार ११ मार्च रोजी सकाळी १० वाजेपर्यंत चालणार आहे. या दुरुस्ती कामामुळे गुरुवार, ९ मार्च  रोजी सकाळी १० वाजेपासून शनिवार, ११ मार्च रोजी सकाळी १० पर्यंत पूर्व उपनगरे आणि शहर विभागातील काही परिसरात १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाणीकपात कुठे?

पूर्व उपनगरे : मुलूंड (पूर्व) व (पश्चिम) विभाग, भांडूप, नाहूर, कांजूरमार्ग, विक्रोळी येथील पूर्व विभाग, विक्रोळी (पूर्व), घाटकोपर येथील (पूर्व) व (पश्चिम) विभाग, कुर्ला (पूर्व) विभाग, देवनार, मानखुर्द, गोवंडी, चेंबूऱ

शहर :  बीपीटी व नौदल परिसर, डोंगरी, मशीद बंदर, भायखळा, माजगाव, लालबाग, परळ, वडाळा, नायगाव.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 percent water cut tomorrow in some parts of mumbai mumbai print news ysh
Show comments