संदीप आचार्य, लोकसत्ता

मुंबई : देशभरात कर्करुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून या रुग्णांसाठी पुरेशा उपचार सुविधा निर्माण होणे अत्यावश्यक बनले आहे. देशभरातून मोठ्या प्रमाणात कर्करुग्ण उपचारासाठी मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये येत असून या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयांनी तसेच राज्यातील महापालिकांनीही त्यांच्याकडे कर्करुग्णांवरील उपचाराच्या सुविधा वाढविण्याची गरज असल्याचे नामांकित कर्करोगतत्ज्ञांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात आगामी काळात कर्करुग्णांवरील उपचारासाठी दहा मजली स्वतंत्र ईमारत उभारण्याचे काम सुरु झाले असून २०२६ पर्यंत पूर्ण क्षमतेने येथे कर्करुग्णांवर उपचार केले जातील.

Sonali Bendre was body shamed due to her long neck, people called her giraffe
“मला जिराफ म्हटलं जायचं”, सोनाली बेंद्रेवर एकेकाळी व्हायची टीका, बॉडिशेमिंगचा आरोग्यावर कसा होतो परिणाम, तज्ज्ञांनी केला खुलासा
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Absence of doctors other staff at Aarey hospital beds Tribal patients suffering for treatment Mumbai print news
आरे रुग्णालय रुग्णशय्येवर डॉक्टर, अन्य कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती; आदिवासी रुग्णांची उपचारांसाठी पायपीट
security guards at VN Desai Hospital , VN Desai Hospital,
डॉक्टरांच्या आंदोलनानंतर व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांमध्ये वाढ, मुंबई महानगरपालिका आयुक्तांसोबतच्या चर्चेनंतर निघाला तोडगा
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
BSNL TV Service With Over 500 Live Channels in India
BSNL IFTV : बीएसएनएलची टीव्ही सेवा सुरू, पाहता येणार ओटीटीसह ५०० हून अधिक लाइव्ह चॅनेल्स
EPF Pension Scheme Eligibility
EPF Pension Schemeसाठी तुम्ही आहात का पात्र? जाणून घ्या काय आहे पात्रता, आर्थिक सुरक्षा आणि करबचत फायदे

नायर रुग्णालयात १९९८ पासून रेडिओ ऑन्कॉलॉजी विभागाच्या माध्यमातून कर्करुग्णांवर उपचार करण्यात येत असून २००७ मध्ये मेडिकल ऑन्कॉलॉजी विभाग सुरु करण्यात आला होता. २०१३ मध्ये नायर रुग्णालयात केमेथेरपी उपचारासाठी डे- केअर सुविधा सुरु करण्यात आली असून मागील तीन वर्षांत सुमारे ७,७०० व्यक्ती व ७०० हून अधिक बालकांवर केमेथेरपी उपचार करण्यात आले आहेत. मागील तीन वर्षांत जवळपास साडेनऊ हजार रुग्णांवर केमेथेरपी उपचार करण्यात आले आहेत. येथील शल्यचिकित्सा विभागात स्तन, जठर, आतडे, स्वादुपिंड, गर्भाशय, घसा, डोके आदींच्या कर्करोगावरील शस्त्रक्रिया करण्यात येत असून २०२२ मध्ये ६४४ कर्करुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे येथील ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले. दिवसेंदिवस नायर रुग्णालयात येणाऱ्या कर्करुग्णांची संख्या लक्षात घेऊन नायरमधील कर्करोग विभागाचा विस्तार करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून यासाठी नवीन दहा मजली इमारत उभरण्यात येत आहे. या इमारतीसाठी १०६ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून एकूण ७० खाटा या रुग्णालयात असतील. यातील ५० खाटा या रेडिओथेरपीच्या रुग्णांसाठी तर २० खाटा केमेथेरपीच्या रुग्णांसाठी असतील. या दहा मजली इमारतीमध्ये दोन लिनर ॲक्सिलेटर मशिन, टेलिकोबाल्ट थेरपी, टेलिथेरपी, ब्रेकीथेरपी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर तसेच पेटस्कॅनपासून अनेक सुविधा असणार आहेत. पहिल्या मजल्यावर लहान मुलांचा विभाग तसेच चाचण्यांच्या सुविधा असतील, तर दुसऱ्या मजल्यावर पेट स्कॅन असणार आहे. सहाव्या मजल्यावर महिलांसाठी तर सातव्या मजल्यावर पुरुषांसाठी विभाग असेल. आठव्या आणि नवव्या मजल्यावर लायब्ररी आणि सेमिनार हॉल असून २०२६ पर्यंत हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरु होईल असा विश्वास नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांनी सांगितले.

नायर रुग्णालयात स्टेम सेल थेरपी, कार-टी थेरपी सुरु केली जाणार असून मेडिकल व पेडियॅट्रिक ऑन्कॉलॉजी या विषयात पदव्युत्तर शिक्षण सुरु करण्याचा मानस असल्याचे सूत्रांनी सांगितले. साधारणपणे रुग्णालयात आजघडीला वर्षाकाठी साडेपाच हजार रुग्णांवर रेडिओथेरपी उपचार केले जातात. तसेच क्लिनिकल फार्माकोलॉजी विभागामार्फत कर्करोगाची तीव्रता, केमेथेरपीमुळे होणारे फायदे तसेच दुष्परिणामांचे भाकित करणाऱ्या फार्मकोजिनोमिक्स सुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय भविष्यात कर्करोगावरील विविध उपचारांमध्ये आवश्यक त्या नव्या सुविधा आणण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. नायर रुग्णालयात मागील तीन वर्षांत मेडिकल ऑन्कॉलॉजीच्या बाह्यरुग्ण विभागात सुमारे २३ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले. सुमारे साडेनऊ हजार रुग्णांवर मागील तीन वर्षात केमेथेरपी उपचार केले गेले तर ११ हजार रुग्णांवर रेडिओथेरपी उपचार करण्यात आले आहेत. हजारांहून अधिक शस्त्रक्रिया मागील तीन वर्षांत करण्यात आल्या असून नवीन दहा मजली रुग्णालयांत अधिक चांगल्या प्रकारे उपचार होणार आहेत. डॉ. गिरीश राजाध्यक्ष, डॉ. सतीश धारप, डॉ. स्निग्धा रॉबीन, डॉ. अलका गुप्ता , डॉ. हिमांशी शाह, डॉ. मुकुंद आदणकर, डॉ. आदिल छगला आणि डॉ. उदय भट या तज्ज्ञ विभागप्रमुखांच्या अधिपत्याखाली उपचार केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.