लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : नव्या वर्षाच्या सुरुवातीला, जानेवारी महिन्यात मुंबईत १० हजार ४६७ घरांची विक्री झाली असून राज्य सरकारला या घरांच्या विक्रीतून मुद्रांक शुल्कापोटी ७१६ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. जानेवारी २०२३ मध्ये केवळ ९००१ घरांची विक्री झाली होती आणि यातून ६९२ कोटी रुपये महसूल मिळाला होता. या तुलनेत यंदा नवीन वर्षाची सुरुवाती चांगली झाली असून पहिल्याच महिन्यात घर विक्रीने १० हजाराचा टप्पा ओलांडला आहे.

Redevelopment of government leased building with express intention of catering to builder lobby by MLA
मला अखेरपर्यंत याच घरात रहायचे आहे…
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
ginning pressing loksatta article
विश्लेषण: राज्यातील सहकारी जिनिंगप्रेसिंग संस्था घसरणीला?
1932 citizens registrations for affordable housing under pmrda scheme
पीएमआरडीएच्या घरांना प्रतिसाद; सदनिकेसाठी १ हजार ९३२ नागरिकांची नोंदणी
Chhagan Bhujbal, yeola assembly constituency,
छगन भुजबळ यांच्या मालमत्तेत साडेतीन कोटींनी वाढ
Amitabh Bachchan Abhishek Bachchan buy 10 apartments worth 25 cr
अमिताभ बच्चन-अभिषेक बच्चन यांनी मुलुंडमध्ये विकत घेतली १० अपार्टमेंट्स, किंमत तब्बल ‘इतके’ कोटी
pune flats loksatta
पुण्यात घरांच्या विक्रीला घरघर! ग्राहकांनी पाठ का फिरवली जाणून घ्या…
mhada
म्हाडा मुंबई मंडळ सोडत ऑक्टोबर २०२४ : २०१७ पैकी ४०० हून अधिक घरे परत, तर १५३० विजेत्यांची घरासाठी स्वीकृती

करोनाकाळानंतर भाडेतत्वावरील घरात राहण्याऐवजी हक्काचे घर घेण्याकडे नागरिकांचा कल वाढवला आहे. त्यामुळे मागील दीड – दोन वर्षात घर विक्रीत चांगली वाढ होताना दिसत आहे. २०२३ मध्ये एक लाख २६ हजार ९०५ घरांची विक्री झाली होती. तर या घर विक्रीच्या माध्यमातून राज्य सरकारला १० हजार ८६० कोटी रुपये महसूल मुद्रांक शुल्कच्या वसुलीतून मिळाला होता. २०२३ मधील घर विक्री आतापर्यंतची सर्वाधिक घर विक्री होती. २०२३ ते २०२० दरम्यान वर्षाला ६३ हजार ते ८० हजारदरम्यान घरे विकली गेली होती. पण करोनानंतर घरांच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. त्यामुळेच २०२१ मध्ये एक लाख ११ हजार ९१३, २०२२ मध्ये एक लाख २२ हजार ३५ आणि २०२३ मध्ये एक लाख २६ हजार ९०५ अशी घरांची विक्री झाली आहे. २०२१ मध्ये घर विक्रीने एक लाखांचा टप्पा पार केला, तर २०२३ मध्ये घर विक्री सव्वालाखांच्या घरात पोहोचली.

आणखी वाचा-बांधकाम व्यावसायिक ललित टेकचंदानींना मुंबई पोलिसांनी केली अटक, आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल

नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात १० हजारांहून अधिक घरांची विक्री झाल्याने तूर्तास तरी बांधकाम क्षेत्राला दिलासा मिळाला आहे. दरम्यान, गुरुवारी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. या अर्थसंकल्पात बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी, घर विक्री वाढविण्यासाठी गृहकर्जाच्या व्याज दरात कपात करण्यासह अनेक उपाययोजना करण्यात येतील, अशी अपेक्षा बांधकाम व्यवसायाला आहेत.