लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी यंदा विशेष काळजी घेण्यात आली असून सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी १०० टक्के वेब कास्टिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही मतदान केंद्रावरील कोणत्याही क्षणाची क्षणचित्रे निवडणूक आयोगाला कोणत्याही वेळी पाहता येणार आहेत. परिणामी, तेथील प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवता येणार आहे.

Image of Rahul Gandhi and Arvind Kejriwal
Markadwadi : उद्धव ठाकरे, राहुल गांधी, केजरीवाल मारकडवाडीला देणार भेट, शरद पवार यांच्या आमदाराने सांगितली तारीख
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
nana patole loksatta news
महाराष्ट्राचे ‘कमलनाथ’?
One Nation One Election Joint Parliamentary Committee
One Nation One Election : ‘वन नेशन, वन इलेक्शन’साठी जेपीसीची स्थापना; प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदेंसह ३१ सदस्यांचा समितीत सहभाग
one nation one election (1)
ONOE: ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला कुणाचा पाठिंबा, कुणाचा विरोध? वाचा संपूर्ण यादी!
Manoj Jarange Chhagan Bhujbal
Manoj Jarange : “…मग फडणवीस त्यांना तुरूंगात फेकून देणार”, मनोज जरांगे यांचा भुजबळांबाबत मोठा दावा
Loksatta pahili baju Markadwadi Live Mahavikas Aghadi EVM Scam Assembly Election Results
पहिली बाजू: ‘मारकडवाडी लाइव्ह’ नेमके कशासाठी?
maharashtra Congress chief nana patole slams mahayuti government over leader of opposition post
विरोधी पक्षनेते पदासाठी अर्ज करावा लागतो का? नाना पटाले अध्यक्षांना सवाल  म्हणाले….

विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईत एकूण १० हजार ११७ मतदान केंद्रांमध्ये मतदान होणार आहे. यापैकी शहर भागात दोन हजार ५३८, तर उपनगरे भागात सात हजार ५७९ मतदान केंद्रे आहेत. यावेळी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व १०० टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यापूर्वीही काही ठिकाणी बेव कास्टिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. मात्र यावेळी ही सुविधा सर्वच मतदान केंद्रावर उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच या वेब कास्टींगची लिंक भारत निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी, सर्व अतिरिक्त जिल्हा निवडणूक धिकारी, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांना उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाला प्रत्येक मतदान केंद्रावर बारीक नजर ठेवता येणार आहे.

आणखी वाचा-विशेष मेट्रो गाडीच्या माध्यमातून पोस्को कायद्याबाबत जनजागृती

८५ वर्षांवरील १.४६ लाख, तर तृतियपंथी १,०८२ मतदार …

मुंबईत एक कोटी दोन लाख २९ हजार ७०८ मतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. त्यामध्ये ५४ लाख ६७ हजार ३६१ पुरुष, तर ४७ लाख ६१ हजार २६५ महिला आणि १,०८२ तृतियपंथी मतदारांचा समावेश आहे. तसेच दोन हजार २८८ भारतीय वंशाचे विदेशी मतदार, २३ हजार ९२७ दिव्यांग मतदार, ८५ वर्षांवरील एक लाख ४६ हजार ८५९ मतदारांचा आणि एक हजार ४७५ सेना दलातील मतदारांचा समावेश आहे.

८४ मॉडेल मतदान केंद्रे

मुंबईत ८४ मॉडेल मतदान केंद्रे उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यामध्ये, महिला संचालित शहर भागातील १२, तर उपनगरांतील २६ अशा एकूण ३८ मतदान केंद्रांचा समावेश आहे. तसेच, तरुण कर्मचारी वर्गांकडून संचालित शहर भागातील १२ आणि उपनगरांतील २६ अशा एकूण ३८ केंद्राचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, शहर भागात दिव्यांगांद्वारे संचालित ८ मतदान केंद्रांचा समावेश आहे.

आणखी वाचा-मतदान केंद्रावर मोबाइल बंदीमुळे मतदान कमी होण्याची भीती

ईव्हीएम

मुंबईमधील ३६ विधानसभा मतदारसंघांसाठी शहर भागात तीन हजार ०४१ आणि उपनगरात ११ हजार १३१ बॅलेट युनिट अशी एकूण १४ हजार १७२ बॅलेट युनिट उपलब्ध करण्यात येणार आहेत. तसेच, शहर भागात तीन हजार ०४१ आणि नऊ हजार ०७९ असे एकूण १२ हजार १२० कंट्रोल युनिट उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे, शहर भागात तीन हजार २९४ तर उपनगर भागात नऊ हजार ८३७ अशी एकूण १३ हजार १३१ व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध करण्यात येणार आहेत.

महापालिका, पोलीस आणि इतर एकूण १ लाख अधिकारी, कर्मचारी नियुक्त…

विधानसभा निवडणुकीचा मोठा भार प्रथमच महापालिका आणि पालिका आयुक्तांवर सोपविण्यात आला आहे. या निवडणुकीत मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी मुंबई महापालिकेतील तब्बल ६० हजाराहून अधिक अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि सुरक्षित वातावरणात मतदान होण्यासाठी मुंबई पोलीस दलातील २६ हजार ६९६ अधिकारी, पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर किमान ५ कर्मचारी तैनात असतील.

Story img Loader