मुंबई : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी) निकाल राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) सोमवारी ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला. यंदा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित (पीसीएम) आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र (पीसीबी) गटात प्रत्येकी १४ विद्यार्थ्यांनी शंभर पर्सेटाईल मिळवले.

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) विविध पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी घेतल्या जातात. राज्यात ९ ते १३ मेदरम्यान ‘पीसीएम’ आणि १५ ते २० मेपर्यंत ‘पीसीबी’ गटाची सीईटी परीक्षा घेण्यात आली. राज्य सीईटी कक्षामार्फत ३६ जिल्ह्यांच्या ठिकाणी १९७ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी १८१ केंद्रे राज्यात आणि १६ केंद्रे राज्याबाहेर होती.

PET, LLM, Admit Card, Pre-Entrance Exams,
‘पेट’ आणि ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षांचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध, विविध केंद्रावर १७ नोव्हेंबरला ऑनलाईन परीक्षा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
MPSC Food Safety Officer exam result due for ten months remains undeclared increasing students anxiety
‘एमपीएससी’ विद्यार्थी मानसिक तणावात…तब्बल दहा महिन्यांपासून या परीक्षेचा…
mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्य सेवा मुख्य परीक्षा- मानवी हक्क पारंपरिक अभ्यास
job opportunity in ordnance factory update in marathi
नोकरीची संधी :ऑर्डनन्स फॅक्टरीत भरती
Nurses without pay for four months Mumbai print news
परिचारिका चार महिने वेतनाविना
Today is the last day to apply for various courses of Idol Mumbai print news
‘आयडॉल’च्या विविध अभ्यासक्रमांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

एमएचटी-सीईटीच्या परीक्षेसाठी एकूण ६ लाख ३६ हजार ८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ५ लाख ९१ हजार १३० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी पीसीएम गटासाठी ३ लाख ३३ हजार ४१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती आणि ३ लाख १३ हजार ७३० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पीसीबी गटासाठी ३ लाख ३ हजार ४८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आणि २ लाख ७७ हजार ४०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पीसीएम आणि पीसीबी गटातून एकूण ३ लाख २९ हजार ८९ विद्यार्थी आणि २ लाख ६२ हजार ४१ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली.

केंद्रीय प्रवेश प्रक्रिया १५ जूनपासून

विद्यार्थ्यांना गुरुवारी १५ जूनपासून केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी (कॅप) अर्ज करता येणार आहे. त्यासाठी सीईटी सेलकडून एक डिजिटल अॅप उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना विषयानुसार गुण, क्रमांक आणि पर्सेटाईल www. mahacet. org ,www. mahacet. in या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येतील. बी.ई, बी.टेकसाठी जवळपास १ लाख ४३ हजार ४१३, एम.ई, एम.टेकसाठी १२ हजार ३१६, बी.फार्मसीसाठी ३६ हजार २२८, एमबीए/एमएमएससाठी ४४ हजार ४७७, तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमासाठी १८ हजार ४२५ आणि ५ वर्षीय विधी अभ्यासक्रमासाठी ११ हजार ८८३ जागा उपलब्ध आहेत.

यंदा निकाल वेळेवर आणि कोणत्याही तांत्रिक अडथळय़ाविना जाहीर करण्यात आला. आम्ही १५ जूनपासून केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू करीत आहोत. जुलैअखेपर्यंत प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी १५ जूनपासून अॅप सुरू करण्यात येईल. – महेंद्र वारभुवन, सीईटी सेल आयुक्त