मुंबई : केईएम रुग्णालयात गुडघा रोपण शस्त्रक्रियेसाठी आणण्यात आलेल्या रोबोटद्वारे मागील पाच महिन्यात १०१ रोबोटीक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या सर्व शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून, रुग्णांनाही अल्पावधीत रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. केईएम रुग्णालयाच्या अस्थिव्यंग विभागामध्ये रोबोट आणण्याचा प्रस्ताव २०१६ मध्ये मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे सादर करण्यात आला होता. मात्र करोनामुळे रोबोट आणण्यासंदर्भातील प्रक्रिया ठप्प झाली.

हेही वाचा >>> Mumbai Crime : प्रेयसीवर बलात्कार केल्याप्रकरणी प्रियकराला अटक; “चल तुला घरी सोडतो” असं सांगितलं, आणि…

Absence of doctors other staff at Aarey hospital beds Tribal patients suffering for treatment Mumbai print news
आरे रुग्णालय रुग्णशय्येवर डॉक्टर, अन्य कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती; आदिवासी रुग्णांची उपचारांसाठी पायपीट
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
security guards at VN Desai Hospital , VN Desai Hospital,
डॉक्टरांच्या आंदोलनानंतर व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांमध्ये वाढ, मुंबई महानगरपालिका आयुक्तांसोबतच्या चर्चेनंतर निघाला तोडगा
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
Doctor aggressive after being beaten by relatives The pediatric department of VN Desai Hospital was closed by doctors Mumbai news
नातेवाईकांकडून मारहाण झाल्याने डॉक्टर आक्रमक; व्ही. एन. देसाई रुग्णालयातील बालरोग विभाग डॉक्टरांनी ठेवले बंद
Nurses without pay for four months Mumbai print news
परिचारिका चार महिने वेतनाविना
Robotic Bariatric Surgery, Obesity, Robotic Bariatric,
‘रोबोटिक बॅरिएट्रिक’ शस्त्रक्रियेद्वारे लठ्ठपणाला कात्री! अधिक अचूकपणे, कमी वेळेत होणाऱ्या प्रक्रियेविषयी जाणून घ्या…
Most robotic surgeries performed by Tata hospital in shortest time
टाटा रुग्णालयाकडून कमी कालावधीत सर्वाधिक रोबोटिक शस्त्रक्रिया

रुग्णांना अधिक चांगली सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत आणि अस्थिव्यंग विभागाचे प्रमुख डॉ. मोहन देसाई यांनी व्यावसायिक सामाजिक दायित्व (सीएसआर) निधीतून अस्थिव्यंग विभागासाठी रोबोट आणला. त्यामुळे देशामध्ये रोबोटद्वारे शस्त्रक्रिया करणारे केईएम रुग्णालय हे पहिले सरकारी रुग्णालय ठरले आहे. केईएम रुग्णालयात मार्च २०२४ रोजी रोबोटच्या माध्यमातून प्रथम यशस्वी गुडघा रोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर सातत्याने या विभागातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करत ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता १०१ वी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली. अवघ्या पाच महिन्यांतच केईएम रुग्णालयामध्ये रोबोटच्या माध्यमातून १०१ शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचे केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी सांगितले. १०१ शस्त्रक्रिया पूर्ण केल्याचा आनंद रुग्णालय प्रशासनाने केक कापून साजरा केला.

आठवड्याला आठ शस्त्रक्रिया…

मार्च २०२४ मध्ये पहिली गुडघा रोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली. त्यानंतर सुरुवातीला आठवड्यात तीन ते चार शस्त्रक्रिया होत होत्या. मात्र अवघ्या काही दिवसांतच शस्त्रक्रियेचा आकडा आठवड्याला आठपर्यंत पोहोचला. या सर्व शस्त्रक्रिया अचूक झाल्या आहेत. रोबोटीक शस्त्रक्रिया करण्यासाठी साधारणपणे तीन ते चार लाख रुपये खर्च येतो. परंतु महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमुळे या शस्त्रक्रिया मोफत होतात. रुग्णांप्रमाणेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही राेबोट शस्त्रक्रिया शिकण्यास मदत होत असल्याचे केईएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक व अस्थिव्यंग विभागाचे प्रमुख डॉ. मोहन देसाई यांनी सांगितले.