मुंबई : पश्चिम रेल्वेवरील दोन वातानुकूलित लोकलमध्ये शुक्रवारी तांत्रिक बिघाड झाला. या घटनेमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. रेल्वे प्रवासादरम्यान उन्हाच्या झळा बसू नये म्हणून प्रवाशांनी गारेगार प्रवासासाठी अधिकचे पैसे मोजून वातानुकूलित लोकलचे तिकीट काढले. मात्र, अचानकपणे वातानुकूलित लोकलमध्ये बिघाड झाल्याने उन्हाच्या काहिलीने हैराण होण्याची वेळ प्रवाशांवर ओढवली.

वातानुकूलित लोकलमध्ये बिघाड झाल्याने तब्बल ११ वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. तर, दुसऱ्या लोकलमधील वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्याने तिचे दरवाजे उघडे ठेवून चालवण्याची नामुष्की पश्चिम रेल्वे प्रशासनावर ओढवली. तसेच, या लोकलची आपत्कालीन साखळी खेचल्यामुळे पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक बिघडले.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
Devendra Fadnavis Dharni, Chikhaldara Skywalk Work,
‘चिखलदरा स्‍कायवॉकचे काम महाविकास आघाडीने थांबविले’, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणीसांचा आरोप
india railway viral news Husband-Wife Fight
नवरा-बायकोतील भांडण अन् रेल्वेचे तीन कोटींचे नुकसान! OK मुळे चुकीच्या स्थानकावर पोहोचली ट्रेन; नेमकं घडलं काय? वाचा…
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी

हेही वाचा >>> Mega Block : तिन्ही रेल्वे मार्गावर उद्या ‘मेगा ब्लॉक’

मध्य रेल्वेवरील कळवा-मुंब्रादरम्यान गुरुवारी वातानुकूलित लोकल अचानक थांबली. या लोकलचे दरवाजे उघडत नव्हते. तसेच शुक्रवारी सकाळी ७.१५ च्या विरार – चर्चगेट लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे सकाळपासून पश्चिम रेल्वेवरील विरार – चर्चगेटदरम्यान धावणाऱ्या वातानुकूलित लोकल रद्द करण्यात आल्या. वातानुकूलित लोकलऐवजी साध्या लोकल चालवण्यात आल्या. त्यामुळे वातानुकूलित लोकलच्या पासधारक आणि तिकीटधारक प्रवाशांना साध्या लोकलमधून प्रवास करावा लागला.

प्रवाशांचा श्वास कोंडला..

 शुक्रवारी सकाळी ८.३५ च्या विरार – चर्चगेट वातानुकूलित लोकलमधील वातानुकूलित यंत्रणा बंद पडली. त्यामुळे लोकलमध्ये प्रवाशांचा श्वास कोंडू लागला. या बिघाडामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. त्यामुळे प्रवाशांनी आपत्कालीन साखळी खेचून लोकल थांबवण्याचा प्रयत्न केला. परिणामी, इतर लोकलचे वेळापत्रक कोलमडले. अखेरीस काही प्रवाशांनी सकाळी ९.२ वाजता मीरा रोड स्थानकांदरम्यान आपत्कालीन साखळी खेचून लोकल थांबवली. त्यानंतर, रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि वातानुकूलित यंत्रणा सुरू करण्यासाठी लोकलमध्ये दाखल झाले. मात्र, डब्यात गर्दी असल्याने ही यंत्रणा सुरू करण्यात अपयश येत होते. त्यामुळे दरवाजे उघडे ठेवून लोकल चर्चगेट दिशेने धावली.

तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उत्तम सेवा देण्याची जबाबदारी पश्चिम रेल्वे प्रशासनाची आहे. मात्र, प्रशासन त्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल नुकसानभरपाई द्यावी. तसेच, एका दिवसाचे तिकिटाचे पैसे परत करावे. निष्काळजीपणाने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी. – सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद

पश्चिम रेल्वेच्या एका वातानुकूलित लोकलमध्ये गुरुवारी रात्री बिघाड झाल्याचे तपासणीत समोर आले. त्यामुळे सात फेऱ्या रद्द करण्यात आल्या. या लोकलच्या जागी साध्या लोकल चालवण्यात आल्या. तर, दुसऱ्या वातानुकूलित गाडीमधील वातानुकूलित यंत्रणेत बिघाड झाला होता. या बिघाडामुळे एकही लोकल रद्द करण्यात आली नसून वातानुकूलित लोकलऐवजी साध्या लोकल चालविण्यात आल्या. तसेच, पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक बिघडले नाही. तिकिटाच्या नुकसानभरपाईबाबत अद्याप ठोस सांगता येणार नाही.

– सुमित ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे