मुंबई : इंडियाच्या दोन दिवसांच्या बैठकीत  इंडिया आघाडीचा समन्वयक नेमण्याचे टाळण्यात येणार आहे. याऐवजी ११ सदस्यीय समन्वय समिती नेमली जाईल. याशिवाय निवडणुकीची रणनीती तसेच जागावाटपाचे सूत्र कसे असावे यावरच प्रामुख्याने चर्चा करण्यात येणार आहे. जागावाटप हे राज्यनिहाय व्हावे, अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इंडिया आघाडीचा समन्वयक नेमल्यावर वाद वाढण्याची शक्यता अधिक आहे.  काँग्रेसला अन्य कोणत्या पक्षाच्या नेत्याचे नेतृत्व मान्य होणे शक्य नाही. आम आदमी पार्टी किंवा तृणमूल काँग्रेससह काही पक्षांचा काँग्रेसकडे आघाडीचे नेतृत्व सोपविण्यास विरोध आहे. यामुळेच समन्वयक नेमण्याचे टाळण्यात येणार असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची समन्वयक म्हणून निवड करावी, असा प्रस्ताव होता. पण नितीशकुमार यांनी आपण समन्वयक होण्यास इच्छूक नाही, असे स्पष्ट केले.

हेही वाचा >>> त्रिस्तरीय सुरक्षा, २८० खोल्या आरक्षित

नितीशकुमार यांच्या नकारानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. पण काँग्रेसकडे नेतृत्व सोपविल्यास अन्य पक्ष आक्षेप घेण्याची शक्यता आहे. याऐवजी समन्वय समिती स्थापन करून त्यात सर्व मोठय़ा पक्षांना प्रतिनिधित्व दिले जाईल.  जागावाटपाचे सूत्र मुंबई बैठकीत निश्चित केले जाईल. शिवसेना किंवा अन्य प्रादेशिक पक्षांनी प्रादेशिक गट तयार करून जागावाटप करावे, असा प्रस्ताव मांडला आहे. राज्यनिहाय जागावाटप करणे अधिक योग्य ठरेल, अशीच सर्व पक्षांची भूमिका आहे. यावर बैठकीत खल केला जाईल.  जागावाटपाची चर्चा आतापासूनच सुरू झाल्यास इंडिया आघाडीत मतभेद किंवा तडे जाण्याची भीती आहे. यातूनच जागावाटप लगेचच सुरू केले जाणार नाही, असेही सांगण्यात आले. केवळ जागावाटपाच्या सूत्रावर चर्चा केली जाईल.

हेही वाचा >>> ‘या’ कारणांसाठी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी घेतली विजय वडेट्टीवार यांची भेट

इंडिया आघाडीच्याच मानचिन्हाचे अनावरण  गुरुवारी केले जाईल. तिरंगी रंगातील या मानचिन्हाबाबत सर्व पक्षांच्या नेत्यांचे मत विचारात घेण्यात येत आहे. तीनमधून एक मानचिन्ह अंतिम केले जाईल. मानचिन्ह आणि संयुक्त निवेदनाच्या मसुद्याची तयारी काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

लालूप्रसाद यादव मुंबईत दाखल

मुंबई : इंडिया बैठकीला उपस्थित राहण्याकरिता राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव व त्यांचे पुत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे मंगळवारी सायंकाळी मुंबईत आगमन झाले.

मुंबई विमानतळावर लालूप्रसाद यादव यांचे माजी मंत्री नसीम खान, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम, माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी व शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी स्वागत केले.

ठाकरे गट १९ जागा लढण्यावर ठाम

मुंबई: मुंबईत इंडियाची तिसरी बैठक होत असताना या आघाडीतील एक घटक पक्ष शिवसेना ठाकरे गटाने लोकसभेच्या १९ जागा राज्यात लढविणार असल्याचे अगोदर जाहीर करून टाकले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एकसंध शिवसेना व भाजप युतीमध्ये शिवसेनेने २३ जागा लढविल्या होत्या तर भाजपने २५ जागेवर लढत दिली होती. यात शिवसेनेने १८ जागांवर तर भाजपने २३ जागांवर विजय मिळविला आहे. राज्यात शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस अशी आघाडी आहे. शिवसेना फुटीनंतर ठाकरे गटाची खासदार व आमदार संख्या कमी झालेली आहे. तरीही शिवसेनेच्या ठाकरे गटाने जादा जागांवरील आपला दावा कायम ठेवला आहे.

बैठकीकडे ‘वंचित’ ‘स्वाभिमानी’ची पाठ

मुंबई : विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या गुरुवारी व शुक्रवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीत ‘स्वाभिमानी’ पक्षाचे राजू शेट्टी तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर सहभागी होणार नाहीत.

मुंबईतील बैठकीत मित्रपक्षांची संख्या वाढेल, असा आघाडीच्या नेत्यांनी दावा केला होता. शेतकरी कामगार पक्ष हा राज्यातून एकमेव पक्ष नव्याने इंडिया आघाडीत सामील होत आहे. स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी यांनी सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले.

प्रदेश काँग्रेसच्या वतीने राहुल गांधी यांचा सत्कार

मुंबई : इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर शुक्रवारी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांचा सत्कार करण्याचे प्रदेश काँग्रेसने नियोजन केले आहे. दादर येथील टिळक भवन कार्यालयात हा सत्कार होणार आहे.   काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची यावेळी उपस्थिती असेल अशी माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. 

एका समाजाचा अवमान केल्याचा ठपका ठेवत सुरत न्यायालयाने राहुल यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.  सर्वोच्च न्यायालयाने  सूरत न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली, त्यामुळे त्यांना पुन्हा खासदारकी बहाल करावी लागली. मोदी सरकारने सूडबुद्धीने त्यांची खासदारकी रद्द केली होती, परंतु त्याविरोधात राहुल यांनी लढाई जारी ठेवली व ते जिंकले, त्यामुळे हा सत्कार करण्याचे ठरविण्यात आले आहे, असे पटोले यांनी सांगितले.