मुंबई : बेस्ट उपक्रमाला मुंबई महानगरपालिका सापत्न वागणूक देत असल्याचा कामगार संघटनांचा आरोप पालिका प्रशासनाने फेटाळून लावला. मागील दहा वर्षांत मुंबई महानगरपालिकेने ‘बेस्ट’ उपक्रमाला ११ हजार २३२ कोटी रुपयांहून अधिक रकमेची मदत केली आहे. तसेच आगामी अर्थसंकल्पातही बेस्टला भरीव मदत करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कुर्ला येथील भीषण बस अपघातानंतर बेस्ट उपक्रमातील परिवहन विभागाच्या दुर्दशेची चर्चा सुरू आहे. बेस्ट उपक्रम हा मुंबई महापालिकेचे अविभाज्य भाग असून पालिकेने बेस्टला आर्थिक मदत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. बेस्टमधील कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी याप्रकरणी काही दिवसांपूर्वी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली होती. बेस्टला आर्थिक मदत करावी व बेस्टमधील भाडेतत्त्वावरील बसगाड्यांचा करार रद्द करावा, अशी मागणी कामगार संघटनेने केली होती. मात्र पालिका आयुक्तांनी कोणतेही आश्वासन दिले नाही, असा आरोप कामगार सेनेने केला होता. तसेच पालिका प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी २६ डिसेंबर रोजी काळ्या फिती लावून काम करण्याचे आवाहन कामगारांना करण्यात आले आहे. तसेच या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईकरांनाही आवाहन करण्यात आले आहे. मात्र कामगार सेना व कामगार संघटनांचे आरोप पालिका प्रशासनाने फेटाळले आहेत.

हेही वाचा >>>वांद्रे, निर्मलनगरमधील म्हाडा संक्रमण शिबिरार्थी रस्त्यावर, निर्मलनगरमध्येच घरे देण्याची मागणी

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे महत्त्व आणि ही वाहतूक व्यवस्था चालविताना येणारी आव्हाने, या सगळ्याची मुंबई महानगरपालिका प्रशासनास पूर्णपणे जाणीव आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून महानगरपालिकेकडून ह्यबेस्टह्ण उपक्रमाला सढळ हस्ते आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जात आहे. मागील १० वर्षांत महानगरपालिकेने ह्यबेस्टह्ण उपक्रमाला ११ हजार २३२ कोटी रुपयांहून अधिक रकमेची मदत केली आहे, असे बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

यावर्षी सुमारे १४०० कोटींचे अनुदान

मुंबई महानगरपालिकेने २०१९ – २० ते २०२३ – २४ या पाच वर्षांच्या कालावधीत बेस्ट उपक्रमाला ८ हजार ५९४ कोटी २४ लाख रूपये इतका भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये महानगरपालिकेने बेस्ट उपक्रमाला ८५० कोटी रुपये दिले आहेत. त्याव्यतिरिक्त ई – बस खरेदीसाठी आतापर्यंत ४९३ कोटी रूपये मिळवून देण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. महानगरपालिकेने बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान (दिवाळी बोनस) म्हणून या वर्षी ८० कोटी रूपये दिले आहेत. तसेच, आगामी अर्थसंकल्पामध्येही भरीव तरतूद करण्याचे नियोजन सुरू आहे, असेही पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.