मुंबई : ठाणे येथील एका कारंज्याच्या प्रदूषित पाण्यातून बुधवारी ११ कासवांची सुटका करण्यात आली. दरम्यान, सुटका करण्यात आलेल्या कासवांचे पुनर्वसन करण्यात आले. ठाणे येथील माजिवडा व्हिलेज रोड, साईनाथ नगर परिसरातील एका कारंज्याच्या प्रदूषित पाण्यात मृत मासे तरंगत असून यामध्ये कासवही असल्याची माहिती या परिसरातील एका रहिवाशाने रेस्क्यूइंक असोसिएशन फॉर वेल्फेअर (रॉ) या संस्थेला फोनवरून दिली.

माहिती मिळताच ‘रॉ’चे पथक वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर बचावकार्यादरम्यान कारंज्याच्या पाण्यात एकूण ११ कासवे आढळली. कारंज्यासाठी वारण्यात येत असलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरली होती. सुटका केलेल्या ११ पैकी नऊ कासवे ही भारतीय फ्लॅपशेल प्रजातीची, तर दोन रेड इअर्ड स्लाइडर प्रजातीची आहेत. दरम्यान, बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर या कासवांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

Nitrate-rich groundwater in Wardha district
धक्कादायक! वर्धा जिल्ह्यातील भूगर्भात नायट्रेटयुक्त पाणी, कर्करोगासह विविध आजार…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
thane police arrest
कल्याणमधील पत्रीपुलाजवळ प्रतिबंधित कोडीन औषधाच्या बाटल्या जप्त
nashik nylon manja loksatta news
नाशिकमध्ये एक लाखाचा नायलाॅन मांजा जप्त
kalyan bar loksatta news
कल्याणमध्ये बारमधील गायिकेला मद्याची बाटली मारण्याचा प्रयत्न; बारमालकाला ग्राहकांची मारहाण, दोन जण अटकेत
Excessive use of chemical fertilizers disrupts the natural chain says MLA Arun Lad
रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे निसर्ग साखळी विस्कळीत – आमदार अरूण लाड
27 goats die after drinking water in a cowshed near Barshi
बार्शीजवळ गोठ्यात पाणी प्यायल्यानंतर २७ शेळ्यांचा मृत्यू
Fishing boat sinks in sea near Alibaug 15 sailors safe
अलिबागजवळ समुद्रात मच्‍छीमार बोट बुडाली, १५ खलाशी सुखरूप

हेही वाचा…अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक

त्यांना एक दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. त्यानंतर योग्य त्या ठिकाणाची निवड करून या कासवांचे पुनर्वसन करण्यात आले, अशी माहिती रॉ संस्थेचे अध्यक्ष पवन शर्मा यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणामुळे तज्ज्ञांनी शहरातील कृत्रिम कारंजा किंवा अशा अनेक जलस्रोतांतील पाण्याची गुणवत्ता अत्यंत दूषित असून त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे. तसेच त्यातील वनस्पती आणि प्राणी यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

Story img Loader