उत्तराखंडमध्ये ठाणे जिल्ह्य़ातील तब्बल १११ पर्यटक अडकले असून रस्ता बंद असल्यामुळे या पर्यटकांचा परतीचा मार्ग बंद झाला आहे. यामध्ये कल्याण-डोंबिवली परिसरातील ८१ रहिवाशांचा समावेश असून यामध्ये ६३ जणांच्या एका ग्रुपचा समावेश आहे. दरम्यान, ठाणे जिल्ह्य़ातील सर्व भाविक सुखरूप असून त्यांच्याकडे खाण्याची पाकिटे तसेच पाण्याच्या बाटल्या पोहचविण्यात आल्या आहेत, अशी माहिती ठाण्याचे तहसीलदार दिनेश कुऱ्हाडे यांनी लोकसत्ताला दिली.
रायगडातील १०२ भाविक उत्तराखंडमधील विविध भागांत अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हे सर्वजण सुखरूप असून मदत व बचाव कार्यासाठी जिल्ह्य़ातील दोन अधिकारी उत्तराखंडला रवाना झाले आहेत.नवी मुंबईतील ६ भाविक उत्तराखंडमध्ये अडकले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा