मुंबई : राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील इयत्ता ११ वीची शैक्षणिक वर्ष २०२४-२५ अंतर्गतची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. विद्यार्थ्यांना ५ जून (सकाळी १० वाजल्यापासून) ते १६ जून (रात्री १० वाजेपर्यंत) या कालावधीत महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा भाग २ भरता येणार आहे. तर, नियमित फेरी १ अंतर्गत २६ जून रोजी सकाळी १० वाजता अकरावी प्रवेशाची ‘पहिली गुणवत्ता यादी’ ऑनलाईन पद्धतीने जाहीर केली जाणार आहे.

पहिल्या गुणवत्ता यादीअंतर्गत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना २६ जून (सकाळी १० वाजल्यापासून) ते २९ जून (सायंकाळी ६ वाजेपर्यंत) या कालावधीत संबंधित महाविद्यालयांत जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे. विद्यार्थ्यांना ५ जून (सकाळी १० वाजल्यापासून) ते १६ जून (रात्री १० वाजेपर्यंत) या कालावधीत महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा भाग २ भरता येणार आहे. विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग २ भरून किमान १ व कमाल १० महाविद्यालये ऑनलाइन पद्धतीने निवडावी लागतील. तसेच नियमित फेरी १ अंतर्गत वैयक्तिक माहिती असणारा अर्जाचा भाग १ हा १५ जून रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत भरता येईल आणि मार्गदर्शन केंद्रावरील सर्व अर्ज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रमाणित होतील. त्यानंतर १८ जून (सकाळी १० वाजल्यापासून) ते २१ जून (सायंकाळी ६ वाजेपर्यंत) या कालावधीत अर्जाचा भाग २ भरलेल्या व पडताळणी झालेल्या विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. सदर गुणवत्ता यादीमधील विद्यार्थी तपशीलामध्ये काही दुरुस्त्या असल्यास विद्यार्थ्यांनी लॉगिनमधील ‘ग्रीव्हन्स टूल’द्वारे ऑनलाईन हरकती नोंदवावी.

MHADA Konkan Board lottery Application sale-approval process extended by 15 days again
म्हाडा कोकण मंडळ सोडत : अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेला पुन्हा १५ दिवसांची मुदवाढ
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Decision to increase maximum age limit by one year for recruitment to various posts of MPSC
‘एमपीएससी’ : ‘या’ परीक्षांसाठी नव्याने अर्जाची संधी, परीक्षेच्या तारखेतही बदल…
Registration for CET exam admissions begin next week
सीईटीची नोंदणी प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होणार
pune municipal Commissioner, Ganeshkhind road, tree cut on Ganeshkhind road, Ganeshkhind road news tree cut pune,
प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आयुक्तांना आदेश, गणेशखिंड रस्त्यावरील वृक्षतोडीचा मुद्दा
Income Tax Return, Income Tax, Tax, loksatta news,
इन्कम टॅक्स रिटर्न अजूनही दाखल करता येईल?
one nation one election in 2034
One Nation One Election: २०२९ ला एकत्र निवडणुका घेणं कठीण, २०३४ साल उजाडणार? काय आहेत कारणं? वाचा सविस्तर!
Maharashtra municipal elections
पालिका निवडणुका एप्रिलनंतर, २२ जानेवारीला सुनावणीवर भवितव्य

हेही वाचा – दहावी – बारावीनंतरचे विविध अभ्यासक्रम व करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन, ठाण्यात ८ व ९ जून रोजी करिअरच्या संधींचा भविष्यवेध

दरम्यान, नियमित फेरी १ अंतर्गत २६ जून रोजी सकाळी १० वाजता अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे, विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीअंतर्गत मिळालेले महाविद्यालय हे स्वतःच्या लॉगिनमध्ये पाहता येईल. त्यानंतर २६ जून (सकाळी १० वाजल्यापासून) ते २९ जून (सायंकाळी ६ वाजेपर्यंत) संबंधित महाविद्यालयांत जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा लागेल. जर पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले असल्यास विद्यार्थ्याला संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे बंधनकारक असेल. तसेच, विद्यार्थ्याला पहिल्या पसंतीक्रमाव्यतिरिक्त मिळालेल्या महाविद्यालयांत प्रवेश निश्चित करायचा नसल्यास पुढील फेरीची विद्यार्थी वाट पाहू शकतात. तसेच, यादरम्यान पुढील नियमित फेरीसाठी नवीन विद्यार्थी नोंदणी आणि अर्ज भाग १ भरणे सुरू राहील. कनिष्ठ महाविद्यालयांना प्रवेशित विद्यार्थ्यांची स्थिती २९ जून रोजी रात्री ८ वाजेपर्यंत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवावी लागणार आहे. तसेच, १ जुलै रोजी कनिष्ठ महाविद्यालयांना नियमित फेरी २ साठी रिक्त जागा (केंद्रीय प्रवेश फेरी व कोटांतर्गत रिक्त जागांचा समावेश असेल) जाहीर करायच्या आहेत. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी https://11thadmission.org.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच, अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसंदर्भात विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यासाठी शिक्षण संचालनालयाकडून संकेतस्थळावर माहिती पुस्तिका उपलब्ध करण्यात आली आहे.

अकरावीच्या पुढील प्रवेश फेरीचे ‘संभाव्य’ वेळापत्रक

प्रवेश फेरी – कालावधी

नियमित प्रवेश फेरी २ – २ जुलै ते ८ जुलै

नियमित प्रवेश फेरी ३ – ९ जुलै ते १८ जुलै

विशेष प्रवेश फेरी १ – १९ जुलै ते २६ जुलै

कोटांतर्गत प्रवेश प्रक्रिया कशी असेल?

प्रत्येक नियमित फेरी बरोबरच विविध कोट्यांतील प्रवेश प्रक्रिया समांतर सुरू राहणार आहे. अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील जागांसोबत संस्थात्मक, अल्पसंख्यांक आणि व्यवस्थापन या कोटांतर्गतच्या जागांसाठीही होत असते. विद्यार्थ्यांना कोटांतर्गत प्रवेशासाठी ५ जून (सकाळी १० वाजल्यापासून) ते १६ जून (रात्री १० वाजेपर्यंत) या कालावधीत नोंदणी करावी लागेल. शून्य फेरीअंतर्गत १८ जून रोजी कोटा पसंती दिलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल. संबंधित विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर प्रसिद्ध केली जाईल, तसेच निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कोटांतर्गत प्रवेशासाठी विद्यालय स्तरावरून दूरध्वनीवरून संपर्क साधला जाईल. त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयांना १८ जून ते २१ जून (सायंकाळी ६ वाजेपर्यंत) या कालावधीत कोटांतर्गत प्रवेश निश्चित करावे लागतील. तसेच २२ ते २५ जून या कालावधीत कोटानिहाय रिक्त राहिलेल्या जागा प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर विद्यार्थी लॉगिनमध्ये जाऊन रिक्त जागांवर पुन्हा पसंतीक्रम नोंदवू शकतील.

हेही वाचा – दुसऱ्या दिवशीही रुग्णसेवा सुरळीत, द्राविडीप्राणायाम करीत कर्मचारी रुग्णालयात दाखल

‘फेरी क्रमांक एक’ या फेरीतील विद्यार्थ्यांची निवड यादी २६ जून रोजी प्रसिद्ध केली जाईल. यातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २६ जून (सकाळी १० वाजल्यापासून) ते २९ जून (सायंकाळी ६ वाजेपर्यंत) या कालावधीत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा लागेल. तसेच, द्विलक्षी अभ्यासक्रमांची (बायोफोकल) प्रवेश प्रक्रिया नियमित फेरी – २ पासून सुरु होईल.

Story img Loader