लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : दहावीच्या पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण, एटीकेटी आणि अद्यापही प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अकरावी प्रवेशाची सातवी विशेष व अंतिम प्रवेश फेरी बुधवार, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० पासून सुरू होत आहे. इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया जवळपास पूर्ण झालेली असून विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची अखेरची संधी असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

ECI remove NCP Ajit Pawar Faction Ad
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नवी जाहीरात वादात, निवडणूक आयोगाकडून आक्षेप; निवडणुकीच्या तोंडावर नामुष्की
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Amol Kolhe on Devendra Fadnavis
Amol Kolhe: “…याचा अर्थ महायुतीचे सरकारच येणार नाही”, देवेंद्र फडणवीसांचे नाव घेत अमोल कोल्हेंची सूचक टिप्पणी!
Tiroda Constituency, Vijay Rahangdale,
तिरोड्यात पुन्हा कमळ फुलणार, की तुतारी वाजणार?
bjp slogans batenge to katenge ek hai to safe hai in maharashtra assembly elections
अग्रलेख : घोषणांच्या म्हशी…
158 parties in the 2086 independent candidate contest maharashtra assembly election 2024
१५८ पक्ष, २०८६ अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात
Voting
मतदानासाठी वयाची अट कोणत्या साली आणि कोणत्या घटनादुरुस्तीने बदलली, हे तुम्हाला माहीत आहे का?

सातव्या विशेष व अंतिम प्रवेश फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांना नवीन नोंदणी, अर्जात बदल, वैयक्तिक माहितीसंबंधित असणारा प्रवेश अर्जाचा पहिला भाग आणि महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा दुसरा भाग शुक्रवार, १३ ऑक्टोबरपर्यंत (सायंकाळी ६ वाजेपर्यंत) भरता येणार आहे. तर महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा दुसरा भरून झाल्यानंतर १३ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत अर्ज लॉक करायचा आहे. त्यानंतर अकरावी प्रवेशाची सातवी विशेष व अंतिम प्रवेश यादी सोमवार, १६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. सातव्या विशेष प्रवेश फेरीअंतर्गत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना सोमवार, १६ ऑक्टोबर (सकाळी १० वाजल्यापासून) ते मंगळवार, १७ ऑक्टोबर (सायंकाळी ६ वाजेपर्यंत) या कालावधीत प्रवेश निश्चित करणे बंधनकारक असेल. तर कोट्यांतर्गत व द्विलक्षी अभ्यासक्रमांचे प्रवेश याच कालावधीत होणार आहेत.

आणखी वाचा-शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने अर्ज मागे घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

दरम्यान, अकरावीच्या सहाव्या विशेष केंद्रीय प्रवेश फेरीसाठी मुंबई महानगरक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असणाऱ्या ९२ हजार ९५० जागांसाठी २ हजार ६९६ विद्यार्थी पात्र होते. त्यापैकी २ हजार १२० विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले आणि १ हजार ७५६ विद्यार्थ्यांनी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित केला. विविध कारणास्तव एका विद्यार्थ्याचा अर्ज नाकारण्यात आला, तर दोन विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले. अद्यापही केंद्रीय प्रवेशाच्या ९१ हजार १९४ जागा रिक्त असून सहाव्या विशेष केंद्रीय प्रवेश फेरीअंतर्गत अर्ज केलेले ५७६ विद्यार्थी अद्यापही प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ अंतर्गत सातवी विशेष प्रवेश फेरी ही अकरावी प्रवेशाची अंतिम फेरी असल्यामुळे विद्यार्थी अथवा कनिष्ठ महाविद्यालयांना प्रवेश रद्द करता येणार नाहीत. त्याचबरोबर यावर्षी ‘फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह’ (एफसीएफएस) फेरी होणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. अकरावी प्रवेशाची सातवी विशेष व अंतिम प्रवेश फेरी दहावीच्या पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण, एटीकेटी आणि अद्यापही प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे. अर्ज भरताना ‘एटिकेटी’च्या विद्यार्थ्यांनी सहा विषयांमध्ये मिळालेले ६०० पैकी एकूण गुण नमूद करायचे आहेत.

यंदा अकरावी प्रवेशासाठी मुंबई महानगरक्षेत्रातील तब्बल २ लाख ८९ हजार ७१८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. केंद्रीय प्रवेश प्रक्रिया आणि कोट्यातील जागांवर अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी २ लाख ६५ हजार ६५९ (९१.०७ टक्के) विद्यार्थ्यांचे प्रवेश आतापर्यंत निश्चित झाले आहेत. तर अद्यापही एकूण २४ हजार ५९ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. सहाव्या विशेष प्रवेश फेरीनंतरही मुंबई महानगरक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाच्या एकूण १ लाख २२ हजार ८१६ (३१.६१ टक्के) जागा रिक्त आहेत. त्यापैकी केंद्रीय प्रवेशाच्या ९१ हजार १९४ जागा, तर संस्थांतर्गत, अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोट्यांतर्गत ३१ हजार ६२२ जागा अद्यापही रिक्त आहेत.

आणखी वाचा-मुंबईः कुलगुरूंच्या नावामुळे महिलेचे बिंग फुटले; खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे महिला लंडनला जात होती

सहाव्या विशेष प्रवेश फेरीनंतर प्रवेश प्रक्रियेची स्थिती (मुंबई महानगरक्षेत्र)

फेरी, कोटा – उपलब्ध जागा – प्रवेश घेतलेले विद्यार्थी – रिक्त जागा

केंद्रीय प्रवेश – २ लाख ४१ हजार ४०२ – २ लाख १० हजार ५९ – ९१ हजार १९४

संस्थात्मक प्रवेश – २५ हजार ४७४ – ९ हजार ४३६ – ६ हजार ८६७

अल्पसंख्याक कोटा – १ लाख ३ हजार ५९५ – ३६ हजार २०५ – १८ हजार १९०

व्यवस्थापन कोटा – १८ हजार ४ – ९ हजार ९५९ – ६ हजार ५६५

एकूण – ३ लाख ८८ हजार ४७५ – २ लाख ६५ हजार ६५९ – १ लाख २२ हजार ८१६

फेरीनिहाय केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची स्थिती (मुंबई महानगरक्षेत्र)

फेरी – उपलब्ध जागा – पात्र विद्यार्थी – निवड झालेले विद्यार्थी – प्रवेश घेतलेले विद्यार्थी

नियमित १ – ३ लाख १ हजार २५३ – २ लाख १५ हजार ७५३ – १ लाख ३६ हजार ५२ – ६१ हजार १८०

नियमित २ – २ लाख ४० हजार ७३ – १ लाख ६१ हजार ७२० – ७५ हजार ८९६ – २४ हजार ४७५

नियमित ३ – २ लाख १५ हजार ५९८ – १ लाख ४४ हजार १८६ – ५७ हजार १४७ – २० हजार १८७

विशेष १ – १ लाख ९५ हजार ४११ – ९३ हजार २०२ – ८० हजार ३९ – ६० हजार १४३

विशेष २ – १ लाख ३५ हजार २६८ – ३७ हजार ४७९ – २८ हजार ६७७ – २० हजार ३३५

विशेष ३ – १ लाख १४ हजार ९३३ – १८ हजार ७०३ – १३ हजार ४ – ९ हजार २७१

विशेष ४ – १ लाख ५ हजार ६६२ – १४ हजार ६४७ – ११ हजार १२० – ८ हजार ८७८

विशेष ५ – ९६ हजार ७८४ – ५ हजार ८२९ – ४ हजार ६२० – ३ हजार ८३४

विशेष ६ – ९२ हजार ९५० – २ हजार ६९६ – २ हजार १२० – १ हजार ७५६