लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: मुंबई महानगरक्षेत्रातील अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज सकाळी १० वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आली. यंदाही मुंबईतील नामांकित महाविद्यालयातील प्रवेश पात्रता गुण (कट ऑफ) नव्वदीपार आहेत.

Olympics to visit India How is the 2036 Games being planned Why are more than one city preferred 
ऑलिम्पिकचे भारतभ्रमण? २०३६ च्या स्पर्धेचे नियोजन कसे? एकापेक्षा अधिक शहरांना का पसंती?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Rupee VS Dollar
Rupee VS Dollar : डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ऐतिहासिक नीचांकावर; कारण काय?
CET , Revised schedule, entrance exams, CET Cell,
सीईटी सेलकडून प्रवेश परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर, काय आहेत बदल?
lowest exchange rate of the Indian currency the rupee
रुपयाची घसरगुंडी सुरूच; प्रति डॉलर ८५.८४ चा नवीन तळ
Border-Gavaskar Trophy Test series Team India defeat australia jasprit bumrah virat kohli rohit sharma
विश्लेषण : बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत टीम इंडियाच्या पराभवास कारणीभूत ठरले हे सहा घटक…
stock market latest marathi news
नफावसुलीने सेन्सेक्सची ७२० अंश माघार
decrease in Mumbai s minimum temperature maximum temperature
सात वर्षांनी शुक्रवार ठरला जानेवारीमधील सर्वाधिक उष्ण दिवस, सांताक्रूझ येथे ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवेश पात्रता गुणात फार फरक पडलेला नाही. यंदा दहावीचा निकाल कमी लागला. त्याचबरोबर ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही घटली. त्यामुळे पुढील फेऱ्यांमध्ये पात्रता गुण आणखी कमी होण्याची शक्यता आहे. पहिल्या गुणवत्ता यादीअंतर्गत ५७ हजार ३२३ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय, २१ हजार ९३४ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीक्रमाचे आणि १५ हजार ६३ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे.

हेही वाचा… कमला मिलमधील व्यापारी केंद्राच्या इमारतीमधील उद्वाहन कोसळून १३ जण जखमी

गतवर्षी चर्चगेटमधील एच. आर महाविद्यालयातील वाणिज्य शाखेसाठी प्रवेश पात्रता गुण ९३.०० % होते, तर यंदा या गुणांमध्ये कोणतीही वाढ झालेली नसून ९३.४०% इतके पात्रता गुण आहेत. माटुंग्यातील रुईया महाविद्यालयातील कला शाखेतील प्रवेश पात्रता गुण गतवर्षी ९१.४०% आणि विज्ञान शाखेतील प्रवेश पात्रता गुण ९२.४०% टक्के होते, यंदा कला शाखेतील प्रवेश पात्रता गुण ९२.८०% आणि विज्ञान शाखेसाठी ९२.२० टक्के इतके आहेत. फोर्ट येथील सेंट झेविअर्स महाविद्यालयात कला शाखेचे प्रवेश पात्रता गुण ९४.६०%, वाणिज्य शाखा ८८.८०% आणि विज्ञान शाखा ९१.००% आहेत. चर्चगेटमधील के.सी महाविद्यालयात कला शाखेसाठी प्रवेश पात्रता गुण ८७.००%, वाणिज्य शाखा ९१.६०%, विज्ञान शाखा ८७.४०%, चर्चगेटमधील जय हिंद महाविद्यालयात कला शाखेसाठी प्रवेश पात्रता गुण ९१.२०%, वाणिज्य शाखा ९२.४०%, विज्ञान शाखा ८८.२०%, माटुंग्यातील रुपारेल महाविद्यालयात कला शाखेसाठी प्रवेश पात्रता गुण ८७.००%, वाणिज्य शाखा ८९.४०%, विज्ञान शाखा ९०.६०% आहेत.

मुंबईतील नामांकित महाविद्यालयातील प्रवेश पात्रता गुण (कट ऑफ)

एच. आर महाविद्यालय, चर्चगेट : ९३.४०%

सेंट झेविअर्स महाविद्यालय, फोर्ट : कला शाखा ९४.६०%, वाणिज्य शाखा ८८.८०%, विज्ञान शाखा ९१.००%

के.सी.महाविद्यालय, चर्चगेट : कला शाखा ८७.००%, वाणिज्य शाखा ९१.६०%, विज्ञान शाखा ८७.४०%

जय हिंद महाविद्यालय, चर्चगेट : कला शाखा ९१.२०%, वाणिज्य शाखा ९२.४०%, विज्ञान शाखा ८८.२०%

रुईया महाविद्यालय, माटुंगा : कला शाखा ९२.८०%, विज्ञान शाखा ९२.२०%

पोद्दार महाविद्यालय, माटुंगा : वाणिज्य शाखा ९३.००%

रुपारेल महाविद्यालय, माटुंगा : कला शाखा ८७.००%, वाणिज्य शाखा ८९.४०%, विज्ञान शाखा ९०.६०%

एस.आय. इ. एस महाविद्यालय, शीव : वाणिज्य शाखा ८६.४०%

साठ्ये महाविद्यालय, विले पार्ले : कला शाखा ८०.००%, वाणिज्य शाखा ८७.४०%, विज्ञान शाखा ८८.६०%

डहाणूकर महाविद्यालय, विलेपार्ले : वाणिज्य शाखा ८९.८०%

भवन्स महाविद्यालय, अंधेरी : कला शाखा ८०.४०%, वाणिज्य शाखा ८७.६०%, विज्ञान शाखा ८८.२०%

मिठीबाई महाविद्यालय, विलेपार्ले : कला शाखा ८७.८०%, वाणिज्य शाखा ९१.२०%, विज्ञान शाखा ८८.६०%

एन. एम. महाविद्यालय, विलेपार्ले : वाणिज्य शाखा ९३.६०%

वझे केळकर महाविद्यालय, मुलुंड : कला शाखा ८७.००%, वाणिज्य शाखा ९१.००%, विज्ञान शाखा ९२.००%

मुलुंड वाणिज्य महाविद्यालय, मुलुंड : वाणिज्य शाखा ९१.००%

बी.एन.बांदोडकर विज्ञान महाविद्यालय, ठाणे : ९१.००%

सी. एच. एम महाविद्यालय, उल्हासनगर : कला शाखा ६७.००%, वाणिज्य शाखा ८३.४०%, विज्ञान शाखा ९०.००%

फादर अग्नेल मल्टीपर्पज महाविद्यालय, वाशी : वाणिज्य शाखा ८५.६०%, विज्ञान शाखा ९३.४०%

सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे : कला शाखा ४६.६०%, वाणिज्य शाखा ७४.२०%, विज्ञान शाखा ८३.२०%

बी.के.बिर्ला महाविद्यालय, कल्याण : कला शाखा ६७.००%, वाणिज्य शाखा ८७.४०%, विज्ञान शाखा ९२.४०%

Story img Loader