मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये सध्या राखीव साठा मिळून १२.७३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. जून महिना संपायला एक आठवडा असून महानगरपालिका प्रशासन पावसाच्या प्रतीक्षेत आहे. या आठवड्यात पाऊस आणि धरणातील जलसाठ्याचा आढावा घेऊन पाणी कपातीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणांतील पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. प्रचंड उष्णतेमुळे धरणातील पाणी जलदगतीने आटत आहे. भातसा व उर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठा वापरण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असून सातही धरणांत सध्या राखीव साठ्यासह १२.७३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठा जुलै महिन्यापर्यंत पुरणार आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाचे पावसाकडे लक्ष लागले आहे. सातही धरणांत मिळून १ लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. तर ऊर्ध्व वैतरणा आणि भातसा धरणांतून अनुक्रमे प्रत्येकी अतिरिक्त ७५ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे एकूण उपलब्ध पाणीसाठा २ लाख ३ हजार ३८१ दशलक्ष लिटरवर पोहोचला आहे. हा साठा १२.७३ टक्के आहे.

हेही वाचा >>>मुंबई: प्रेमसंबंधाचा संशय घेणाऱ्या पतीची हत्या

जून महिना संपायला आता केवळ आठ दिवस शिल्लक असून संपूर्ण महिना कोरडा गेला आहे. २४ जूनपासून चांगला पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. या आठ दिवसांत चांगला पाऊस पडला व विशेषतः धरणक्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली तर पाणी कपातीचे संकट टळू शकेल.

हेही वाचा >>>मुंबईसह ठाणे, नवी मुंबईच्या काही भागात पावसाची हजेरी

एक टक्का पाणी तीन दिवस पुरते !

मुंबईला दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. एक टक्का पाणी साधारण तीन दिवस पुरते. त्यामुळे सध्या धरणात केवळ ३६ दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे, अशी माहिती महानगरपालिका अधिकाऱ्यांनी दिली.

सातही धरणातील पाणीसाठा …..१ लाख ०० हजार १११ दशलक्ष लिटर…….६.९२टक्के

राखीव साठा…….१ लाख ५० हजार दशलक्ष लिटर …..

एकूण पाणीसाठा ….२ लाख ०३ हजार ३८१ दशलक्ष लिटर ……..१२.७३ टक्के