आणखी दोन गाडय़ा दाखल; मध्य रेल्वेकडून फेऱ्यांत वाढ
एप्रिल महिन्याच्या अखेरीस हार्बर मार्गावर सुरू झालेल्या १२ डब्यांच्या गाडय़ांच्या सेवांमध्ये मध्य रेल्वेने वाढ केली आहे. आतापर्यंत या मार्गावर १२ डब्यांची फक्त एकच गाडी धावत होती. मात्र मंगळवारी यात आणखी एका गाडीची भर पडली. या गाडीद्वारे ११ सेवा दर दिवशी चालवल्या जातील, तर बुधवारी आणखी एक १२ डब्यांची गाडी या मार्गावर दाखल झाली असून या गाडीद्वारे १४ सेवा दर दिवशी चालवण्यात येणार आहेत. आता हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या तीन गाडय़ांमार्फत ३९ सेवा धावतील.
हार्बर मार्गावर ४१ गाडय़ांद्वारे ६०० सेवा दर दिवशी चालवल्या जातात. २८ एप्रिलपर्यंत या मार्गावर सर्व गाडय़ा ९ डब्यांच्या चालवल्या जात होत्या. मात्र २९ एप्रिलला या मार्गावर १२ डब्यांची पहिली गाडी धावली.
आतापर्यंत या गाडीद्वारे १२ डब्यांच्या १४ सेवा हार्बर मार्गावर चालवल्या जात होत्या. आता मध्य रेल्वेने मंगळवारी १२ डब्यांची आणखी एक गाडी सुरू केली आहे. ही गाडी ११ सेवा चालवणार आहे, तर बुधवारी १२ डब्यांच्या तिसऱ्या गाडीद्वारे हार्बर मार्गावर आणखी १४ सेवा सुरू होतील.