मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱया प्रवाशांसाठी खुशखबर आहे. हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या लोकलसाठीचा मुहूर्त अखेर निश्चित करण्यात आला आहे. येत्या शुक्रवारपासून हार्बर मार्गावर १२ डब्यांची लोकल धावणार आहे. शुक्रवारी सकाळी वाशी ते वडाळादरम्यान पहिली १२ डब्यांची लोकल धावेल. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर १२ डब्यांची लोकल धावत असतानाही हार्बरवर अद्याप ९ डब्यांचीच लोकल धावत होती. मात्र, आता १२ डब्यांच्या लोकलमुळे प्रवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
याआधी हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या लोकलची चाचणी घेण्यात आली होती. मात्र, चाचणीत मध्य रेल्वे थोडक्यात नापास झाली होती. चाचणीदरम्यान वडाळा आणि डॉकयार्ड रोड येथे प्लॅटफॉर्मची लांबी कमी असल्याचे निरीक्षण रेल्वे अधिकाऱ्यांनी नोंदवले होते.

Story img Loader