लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : जागतिक पातळीवर गेल्या १७५ वर्षांत यंदाचा ऑक्टोबर महिना दुसऱ्या क्रमाकांचा उष्ण महिना ठरला आहे. तर भारत आणि पाकिस्तान आणि दक्षिण अमेरिकेत यंदा ऑक्टोबर महिना आजवरचा सर्वांधिक उष्ण ठरला आहे. ऑक्टोबर महिन्यात जगातील १२ टक्के भूभागावर सरासरीपेक्षा जास्त तापमान होते, असे निरिक्षण अमेरिकेच्या नॅशनल ओशनिकॲण्ड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन (नोआ) यांनी दिली आहे.

Maximum temperature drop in Mumbai,
मुंबईच्या कमाल तापमानात घट
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
pune cold spell in Pune subsided with temperatures rising and light rain expected from December 26
थंडीचा कडाका सरला, आता हलक्या पावसाची चिन्हे
Mumbaikars are suffering from afternoon heat despite cool mornings for past few days
उकाड्याने मुंबईकर हैराण
On Monday cold wave affected Nagar Pune Malegaon Marathwada Gondia, Nagpur and Akola
नगरमध्ये थंडीचा कहर; १९७०ची पुनरावृत्ती जाणून घ्या, महाराष्ट्रसह देशभरातील थंडीची स्थिती
Badlapur temperature, thane district temperature fell,
जिल्ह्यातला पारा घसरला, बदलापुरात सर्वात कमी १०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
Nagpur Winter Session, Vidarbha Cold,
उपराजधानी गारठली अन् राजकीय वातावरण तापले; हिवाळी अधिवेशनाआधी…
mumbai, Coldest December, minimum temperature
मुंबई : नऊ वर्षांतील थंड डिसेंबर

नॅशनल ओशेनिक ॲण्ड ॲटमॉस्मफेरिक ॲडमिनिस्ट्रेशनने दिलेल्या माहितीनुसार, जागतिक पातळीचा विचार करता यंदाचा ऑक्टोबर महिना आजवरचा दुसऱ्या क्रमाकांचा उष्ण महिना ठरला आहे. २० व्या शतकातील ऑक्टोबर महिन्यातील सरासरी जागतिक तापमान १४ अंश सेल्सिअस आहे, त्या तुलनेत यंदाच्या ऑक्टोबरमधील तापमान १.३२ अंश सेल्सिअसने जास्त राहिले. यापूर्वी २०२३ मधील ऑक्टोबर महिना आजवरचा सर्वाधिक उष्ण ऑक्टोबर महिना ठरला होता. ऑक्टोबर २०२३मध्ये जागतिक तापमान सरासरीपेक्षा १.३७ अंश सेल्सिअसने जास्त होते.

वाचा-काळबादेवीतील हत्येप्रकरणी आरोपीला अटक

यंदा ऑस्ट्रेलियाने १९१० नंतर दुसऱ्या क्रमांकाचा उष्ण ऑक्टोबर अनुभला आहे. चालू वर्षातील पहिल्या दहा महिन्यांतील तापमानाचा विचार करता २० व्या शतकातील सरासरी तापमानापेक्षा १.२८ अंश सेल्सिअसने जास्त तापमान राहिले. आफ्रिका, युरोप, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि शेजारील देश, दक्षिण अमेरिकेत १७५ वर्षांच्या हवामान इतिहासात यंदाचे पहिले दहा महिने उष्ण महिने ठरले आहेत. वाढत्या तापमानामुळे फक्त जमिनीवरील तापमान वाढते, असे नाही. समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमानही वाढत आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमानातही वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान, नोआने २०२४ हे वर्षा हवामानाच्या इतिहासात आजवरचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या पूर्वी कोपरनिकस क्लायमेट चेंज सर्व्हिसनेही २०२४ हे वर्ष इतिहासातील सर्वांत उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता वर्तविली होती. या पूर्वी २०२३ हे आजवरचे सर्वांत उष्ण वर्ष म्हणून नोंद झालेले आहे. त्यावर्षीचे तापमान सरासरीपेक्षा १.४८ अंश सेल्सिअसने जास्त होते.

आणखी वाचा-तरुणीचे चित्रीकरण करून धमकावणाऱ्या तरुणाला बेड्या

अमेरिकेत थंडीच्या महिन्यांमध्ये पश्चिमी थंड वाऱ्याचे झोत कमी प्रमाणात आल्यामुळे महासागरांच्या पृष्ठभागांच्या तापमानताही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या तापमान वृद्धीमुळे जागतिक पातळीवरील हवामानाच्या प्रारुपाला मोठा धक्का बसला आहे. जागतिक पातळीवर ऑक्टोबर महिन्यात स्पेनमध्ये महापूर आला, त्यात २०० लोकांचा जीव गेला. ट्रॉमी चक्रीवादळामुळे फिलिफिन्सला अतिवृष्टी, भूस्खलनाचा सामना करावा लागला. त्यात १२५ लोकांचा जीव गेला. दक्षिण अमेरीकेला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला.

ऑक्टोबरमध्ये भारत तापला

भारतीय हवामान विभागानेही (आयएमडी) १९०१ पासूनच्या हवामान विषयक नोंदीनुसार यंदाचा ऑक्टोबर आजवरचा सर्वांत उष्ण महिना ठरल्याचे म्हटले आहे. राजधानी दिल्लीचा विचार करता १९५१ पासूनच्या हवामान विषयक नोंदीनुसार पहिल्यांदाच दिल्लीने इतका उष्ण ऑक्टोबर अनुभला. यंदा पहिल्यांदाच असे झाले की, ऑक्टोबरमध्ये दिल्लीत पावसाचा एक थेंबही पडला नाही. भारत, पाकिस्तान आणि दक्षिण अमेरिकेत यंदाचा ऑक्टोबर आजवरचा सर्वांधिक उष्ण ऑक्टोबर महिना ठरला आहे. ऑक्टोबरमध्ये दक्षिण अमेरिकेतील ८७ टक्के भूभागाला दुष्काळ सदृशस्थितीची सामना करावा लागला.

Story img Loader