लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांच्या सोयीसाठी गुरुवारी मध्यरात्री परळ – कल्याण आणि कुर्ला – पनवेल स्थानकांदरम्यान १२ विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. या लोकल सर्व स्थानकांवर थांबणार आहेत.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेवरील कुर्ला – परळ विशेष लोकल कुर्ला येथून गुरुवारी रात्री १२.४५ वाजता सुटेल आणि परळ येथे रात्री १.०५ वाजता पोहचेल. कल्याण – परळ विशेष लोकल कल्याण येथून रात्री १ वाजता सुटेल आणि परळ येथे रात्री २.१५ वाजता पोहोचेल. ठाणे – परळ विशेष लोकल ठाणे येथून रात्री २.१० वाजता सुटेल आणि परळ येथे रात्री २.५५ वाजता पोहोचेल.

आणखी वाचा-रेल्वे परिसरात हरवलेल्या ५३८ मुले स्वगृही रवाना

परळ – ठाणे विशेष लोकल परळ येथून रात्री १.१५ वाजता सुटेल आणि ठाणे येथे रात्री १.५५ वाजता पोहोचेल. परळ – कल्याण विशेष लोकल परळ येथून रात्री २.२५ वाजता सुटेल आणि कल्याण येथे रात्री ३.४० वाजता पोहोचेल. परळ – कुर्ला विशेष लोकल परळ येथून रात्री ३.०५ वाजता सुटेल आणि कुर्ला येथे रात्री ३.२० वाजता पोहोचेल.

हार्बर मार्गावरील वाशी – कुर्ला विशेष लोकल वाशी येथून रात्री १.३० वाजता सुटेल आणि कुर्ला येथे रात्री २.१० वाजता पोहोचेल. पनवेल – कुर्ला विशेष लोकल पनवेल येथून रात्री १.४० वाजता सुटेल आणि कुर्ला येथे रात्री २.४५ वाजता पोहोचेल. वाशी – कुर्ला विशेष लोकल वाशी येथून रात्री ३.१० वाजता सुटेल आणि कुर्ला येथे रात्री ३.४० वाजता पोहोचेल. कुर्ला – वाशी विशेष लोकल कुर्ला येथून रात्री २.३० वाजता सुटेल आणि वाशी येथे रात्री ३.०० वाजता पोहोचेल. कुर्ला – पनवेल विशेष लोकल कुर्ला येथून रात्री ३.०० वाजता सुटेल आणि पनवेल येथे पहाटे ४.०० वाजता पोहोचेल. कुर्ला – वाशी विशेष लोकल कुर्ला येथून पहाटे ४.०० वाजता सुटेल आणि वाशी येथे पहाटे ४.३५ वाजता पोहोचेल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12 special local train service mahaparinirvan day mumbai print news mrj