मुंबई सीमाशुल्क विभागाने जानेवारी महिन्यात केलेल्या विविध कारवायांमध्ये १२० कोटी रुपयांचे सोने, परदेशी चलन व अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. त्यात ७५ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ, ४२ कोटी रुपयांचे सोने व साडेतीन कोटी रुपयांच्या परदेशी चलनाचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या अंमलीपदार्थांमध्ये कोकेन व हेरॉईनचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.

हेही वाचा- मुंबई: काळा घोडा कला महोत्सवात नाकारलेल्या वस्तूंतून सृजनाविष्कार!

Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
Marijuana worth Rs 115 crore seized from Mumbai airport in three months
मुंबई विमानतळावरून तीन महिन्यात ११५ कोटींचा गांजा जप्त
chhatrapati Sambhajinagar sports complex scam
१३ हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याने घातला २१ कोटींचा गंडा; प्रेयसीला दिला ४ बीएचकेचा फ्लॅट, स्वतः घेतल्या आलिशान गाड्या
holiday rush leads to traffic congestion on highway in maharashtra
सुट्ट्यांमुळे महाकोंडी; सर्वच महामार्गांवर वाहनांची प्रचंड गर्दी, खंडाळा घाटात १०-१२ किलोमीटरपर्यंत रांगा
buldhana vidarbha
निर्यात क्षेत्रात ‘हा’ जिल्हा पश्चिम विदर्भात अव्वल; ४६५ कोटींची निर्यात
mcoca action against Chuha Gang, Pune, Chuha Gang,
पुणे : दहशत माजविणार्‍या ‘चूहा गँग’वर मोक्का कारवाई, आंबेगाव पोलिसांची कारवाई

मुंबई सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तवार्ता कक्षाने जानेवारी २०२३ मध्ये सुमारे ८१ किलो सोने जप्त केले. त्याची किंमत सुमारे ४२ कोटी रुपये आहे. शरीरावर चिकटवून, चप्पल, कमरेच्या पट्ट्यामध्ये लपवून, विविध क्लृप्त्यांचा वापर करून ट्रॉली बॅगमधून सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

हेही वाचा- मुंबई: अपेक्षेपेक्षा अधिक खर्च झालेल्या  १२ गृहप्रकल्पांची `महारेराʼकडून तपासणी

जानेवारी २०२३ मध्ये आठ वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये प्रवाशांकडून तीन कोटी ४७ लाख रुपयांचे परदेशी चलन जप्त करण्यात आले. त्यात दोन लाख ३६ हजार अमेरिकन डॉलर, ३८ हजार पाऊंड स्टर्लिंग, चार लाख ५५ हजार यूएई दिऱ्हाम, ४० हजार सौदी रियाल यांचा समावेश आहे. पुस्तकांच्या पानांमध्ये लपवून ठेवण्याच्या नावीन्यपूर्ण पद्धतींचा आणि फळांसाठी वापरण्यात येणाऱ्या पुठ्ठ्याच्या खोक्यांचा वापर करून चलनाची तस्करी केली जात होती.

हेही वाचा- मुंबई: सोन्याच्या दातांमुळे फरार आरोपीला पकडण्यात यश; विम्याचे आमीष दाखवून रचला सापळा

मुंबई सीमाशुल्क विभागाने अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोहीम हाती घेतली असून तीन विविध कारवायांमध्ये चार किलो ४७० ग्रॅम हेरॉईन आणि चार किलो ४०६ ग्रॅम कोकेन असे एकूण ७५ कोटी ३५ लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले. कागदपत्रांच्या फोल्डरमध्ये, कपड्यांचा बटण आणि बॅगांमधील छुप्या कप्प्यांमध्ये लपवून अंमली पदार्थांची तस्करी करण्यात आली होती.

Story img Loader