महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या टेंभू आणि उरमोडी या दोन प्रकल्पासाठी १२० कोटी रूपयांचा निधी  तातडीने वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निधीतून दुष्काळी भागातील कामांना प्राधान्य देण्यात येणार असल्याची  माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
टेंभू आणि उरमोडी या दोन प्रकल्पामुळे ज्या दुष्काळी भागाला फायदा होतो त्याच्या पहिल्या टप्प्याचे पाणीपूजन करतांना या दोन्ही प्रकल्पाला अधिक गती देण्यासाठी त्वरीत निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी  दुष्काळी दौऱ्यावर असतांना जाहीर केले होते. या अनुषंगाने टेंभू आणि उरमोडी प्रकल्पांच्या पंप हाऊसची आणि कालव्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Story img Loader