गणेशोत्सवाचे रेल्वेचे आरक्षण काही मिनिटांतच फुल्ल झाल्याने खट्टू झालेल्या चाकरमान्यांना रेल्वेने थोडासा दिलासा दिला आहे. यंदा गणेशोत्सवादरम्यान मध्य रेल्वे कोकण रेल्वेमार्गावर तब्बल १२० विशेष फेऱ्या चालवणार आहे. गेल्या वर्षी याच मार्गावर मध्य रेल्वेने ८८ विशेष फेऱ्या चालवल्या होत्या. विशेष म्हणजे पहिल्यांदाच मध्य रेल्वे दोन संपूर्ण अनारक्षित गाडय़ा आणि एक संपूर्ण वातानुकुलित गाडी सोडणार आहे. मुंबईहून कोकणात जाणारी गर्दी लक्षात घेता गरज पडल्यास डब्यांचा अंदाज घेऊन या गाडय़ांच्या डब्यांची संख्याही वाढवण्याचा विचार मध्य रेल्वे करेल, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अतुल राणे यांनी सांगितले.
यंदा मध्य रेल्वे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि दादर येथून एकूण सात गाडय़ा सोडणार आहे. या सात गाडय़ा ४ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर या दरम्यान दोन्ही बाजूंनी चालवल्या जातील. या गाडय़ांचे आरक्षण ३१ जुलैपासून सुरू होणार आहे. या गाडय़ांची माहिती खालीलप्रमाणे झ्र्

मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मडगांव (गुरुवार वगळून सहा दिवस. आरक्षित गाडी) एकूण ३२ फेऱ्या
* ०१०३३ डाउन-निघण्याची वेळ –  ००.२०, मडगांवला पोहोचण्याची वेळ – १४.१० (१६ फेऱ्या)
* ०१०३४ अप – निघण्याची वेळ – १४.४० मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला
* पोहोचण्याची वेळ – ४.३० (१६ फेऱ्या), डब्यांची संख्या – १६.

२ लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगांव, वातानुकुलित विशेष गाडी (फक्त गुरुवार) ६ फेऱ्या
* ०१०४५ डाउन – निघण्याची वेळ – ००.५५, मडगांवला पोहोचण्याची
वेळ – १४.१० (३ फेऱ्या)
* ०१०४६ अप – निघण्याची वेळ –
१४.४०, लोकमान्य टिळक टर्मिनसला
* पोहोचण्याची वेळ – ४.१० (३ फेऱ्या), डब्यांची संख्या झ्र् १५

३ लोकमान्य टिळक टर्मिनस ते पेडणे, आरक्षित
विशेष गाडी (आठवडय़ातील दोन दिवस) १२ फेऱ्या
* ०१०३९ डाउन – निघण्याची वेळ – १३.००, पेडणे येथे पोहोचण्याची वेळ – १.३० (फक्त रविवार, बुधवार ६ फेऱ्या)
* ०१०४० अप – निघण्याची वेळ – १०.४०, लोकमान्य टिळकला पोहोचण्याची वेळ – २२.१५ (फक्त,  सोमवार, गुरुवार ६ फेऱ्या)
* डब्यांची संख्या – १७
४ छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पेडणे, आरक्षित गाडी (आठवडय़ातील दोन दिवस) १० फेऱ्या
* ०१०४१ डाउन – निघण्याची वेळ – १२.२५ (दु.), पेडणे येथे पोहोचण्याची वेळ – १.३० (फक्त मंगळवार, शनिवार ५ फेऱ्या)
* ०१०४२ अप – निघण्याची वेळ – १०.४०, छत्रपती शिवाजी टर्मिनसला पोहोचण्याची वेळ – २२.२० (बुधवार, विवार ५ फेऱ्या)
* डब्यांची संख्या – २३
५ लोकमान्य टिळक टर्मिनस ते पेडणे, आरक्षित गाडी (आठवडय़ातील एक दिवस) ६ फेऱ्या  
* ०१०४३ डाउन – निघण्याची वेळ – १३.००, पेडणे येथे  पोहोचण्याची वेळ – १.३० (फक्त शुक्रवार ३ फेऱ्या)
* ०१०४४ अप – निघण्याची वेळ – १०.४०, लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचण्याची वेळ – २२.१५ (फक्त शनिवार ३ फेऱ्या)
* डब्यांची संख्या – १७

लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी, अनारक्षित गाडी (प्रतिदिन) ३८ फेऱ्या
* ०१०३७ डाउन – निघण्याची वेळ – १.०० (रात्री), रत्नागिरीला पोहोचण्याची वेळ – ९.०५ (१९ फेऱ्या)
* ०१०३८ अप – निघण्याची वेळ – ११.३०, लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचण्याची वेळ – १९.२० (१९ फेऱ्या)
डब्यांची संख्या – १६

दादर ते सावंतवाडी, अनारक्षित गाडी (आठवडय़ातून तीन दिवस) १६ फेऱ्या
’०१००३ डाउन – निघण्याची वेळ – ७.५०, सावंतवाडीला पोहोचण्याची वेळ – २०.३० (रविवार, मंगळवार, शुक्रवार ८ फेऱ्या)
’०१००४ अप – निघण्याची वेळ – ४.५०, दादरला पोहोचण्याची वेळ – १६.१० (सोमवार, बुधवार, शनिवार ८ फेऱ्या)
डब्यांची संख्या – १३

Story img Loader