गणेशोत्सवाचे रेल्वेचे आरक्षण काही मिनिटांतच फुल्ल झाल्याने खट्टू झालेल्या चाकरमान्यांना रेल्वेने थोडासा दिलासा दिला आहे. यंदा गणेशोत्सवादरम्यान मध्य रेल्वे कोकण रेल्वेमार्गावर तब्बल १२० विशेष फेऱ्या चालवणार आहे. गेल्या वर्षी याच मार्गावर मध्य रेल्वेने ८८ विशेष फेऱ्या चालवल्या होत्या. विशेष म्हणजे पहिल्यांदाच मध्य रेल्वे दोन संपूर्ण अनारक्षित गाडय़ा आणि एक संपूर्ण वातानुकुलित गाडी सोडणार आहे. मुंबईहून कोकणात जाणारी गर्दी लक्षात घेता गरज पडल्यास डब्यांचा अंदाज घेऊन या गाडय़ांच्या डब्यांची संख्याही वाढवण्याचा विचार मध्य रेल्वे करेल, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अतुल राणे यांनी सांगितले.
यंदा मध्य रेल्वे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि दादर येथून एकूण सात गाडय़ा सोडणार आहे. या सात गाडय़ा ४ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर या दरम्यान दोन्ही बाजूंनी चालवल्या जातील. या गाडय़ांचे आरक्षण ३१ जुलैपासून सुरू होणार आहे. या गाडय़ांची माहिती खालीलप्रमाणे झ्र्
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा