मुंबई : मुंबई – गोव्यादरम्यानच्या जलद प्रवासासाठी मध्य आणि कोकण रेल्वेवरून मुंबई – गोवा वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्यात येत आहेत. परंतु, पावसाळ्यात मुंबई – गोवा वंदे भारत एक्स्प्रेसच्या अप आणि डाऊन १२४ फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांचा हिरमोड झाला आहे. अतिरिक्त रेक अभावी वंदे भारतच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याचे समजत आहे.

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोकण रेल्वेवर १० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. पावसाळ्यात या मार्गावरील दृश्यमानता कमी झाल्याने आपत्कालीन घटना होऊ नये यासाठी रेल्वेगाड्यांचा वेग कमी केला जातो. त्यामुळे बहुतांश रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात येतो. याचा सर्वाधिक फटका अति जलद रेल्वेगाड्यांना बसतो. यात वंदे भारत एक्स्प्रेसचाही समावेश आहे. आठवड्यातून सहा वेळा धावणारी वंदे भारत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त तीन दिवस धावणार आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. तसेच पावसाळ्यात मुंबई – गोवादरम्यानचे निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक वंदे भारतमधून प्रवास करणे पसंत करतात. मात्र, जून – ऑक्टोबर कालावधीत मुंबई – गोवा वंदे भारतच्या १२४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून यादरम्यान प्रवाशांना वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करणे अवघड होणार आहे.

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
ravindra waikar
वायकर यांच्या विजयाला उच्च न्यायालयात आव्हान, वायकरांचा विजय फसवणुकीद्वारे झाल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
Housing Society
दोनपेक्षा जास्त मुले असलेली व्यक्ती गृहनिर्माण संस्थेचा समिती सदस्य म्हणून अपात्र, उच्च न्यायालयाचा निर्वाळा
maharashtra ministers in modi govt
मोदींच्या मंत्रिमंडळात मुरलीधर मोहोळांकडे मोठी जबाबदारी? महाराष्ट्रातील सहा मंत्र्यांकडे कोणती खाती?
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Anil Parab
“उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सेनापती…”, फडणवीसांकडून ठाकरे गटाच्या आमदाराचं तोंडभरुन कौतुक
Devendra Fadnavis on Atal Setu
अटल सेतूला तडे गेले का? फडणवीसांकडून स्पष्टीकरण देत काँग्रेसवर हल्लाबोल; म्हणाले, “अशा खोट्या अफवा…”
Ghatkopar hoardings
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट; होर्डिंगला परवानगी देणाऱ्या IPS अधिकाऱ्याच्या पत्नीचं कनेक्शन? अनोळखी खात्यातून व्यवहार

हेही वाचा : पोर्शे अपघात प्रकरण: अपघातामुळे अल्पवयीन आरोपीवरही मानसिक आघात, उच्च न्यायालयाचे निरीक्षण

रेक अभावी वंदे भारतच्या फेऱ्यांमध्ये कपात

पावसाळी वेळापत्रक लागू केल्याने काही रेल्वेगाड्यांच्या फेऱ्यांमध्ये कपात करण्यात आली आहे. यात वंदे भारत एक्स्प्रेसचा समावेश आहे. सकाळी सीएसएमटीवरून वंदे भारत एक्स्प्रेसचा एक रेक दुपारी मडगावला पोहचतो. त्यानंतर हाच रेक सीएसएमटीला पाठविण्यात येतो. मात्र, पावसाळ्यात रेल्वे गाड्यांचा वेग कमी झाल्याने वंदे भारत एक्स्प्रेसचा रेक टर्मिनसवर वेळेत पोहचत नाही. त्यामुळे परतीचा प्रवास करताना दुसऱ्या डब्याची आवश्यकता आहे. परंतु, रेक नसल्याने वंदे भारत आठवड्यातून तीन वेळा चालवण्यात येत आहे. यासह जादा रेक उभा करण्यासाठी सीएसएमटी येथे जागेचा अभाव आहे, असे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.

कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रकामुळे पावसाळ्यात वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातील सहाऐवजी तीन दिवस धावत आहे.

डॉ. स्वप्निल निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

हेही वाचा : वैद्यकीय अभ्यासक्रम परीक्षा: एकही दिवस सुट्टी न देता परीक्षा घेण्याच्या विद्यापीठाच्या निर्णयाला विद्यार्थ्यांचा विरोध

पावसाळी वेळापत्रकानुसार मुंबई – गोवा दरम्यानचे सुमारे ५८६ किमी अंतर कापण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेसला ८ ते १० तास लागतात. गाडी क्रमांक २२२२९ सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी पहाटे ५.२५ वाजता सीएसएमटीवरून सुटते आणि मडगाव येथे दुपारी ३.३० वाजता पोहचते. तर गाडी क्रमांक २२२३० मडगाववरून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी दुपारी १२.२० वाजता सुटते आणि रात्री १०.२५ वाजता सीएसएमटी मुंबईला पोहचते.