मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) गुरुवारी मुंबईतील एका आस्थापनेवर छापा टाकून १२६४ किलो चहा पूड जप्त केली. स्वच्छतेचे कोणतेही नियम न पाळत चहाचे रिपॅकिंग केले जात असल्याने, चहाचा रंग संशयास्पद वाटल्याने आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडे कोणत्याही परवाना नसल्याने अधिकाऱ्याने कारवाई करून चहा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या चहाची किंमत २ लाख ३ हजार ९८० रुपये आहे.
हेही वाचा : मुंबई : पोलीस आयुक्तांच्या नावाने फसवणूकीचा प्रयत्न
चहाचे चार नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. यासंबंधीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. एफडीएने मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी नरसी नाथा स्ट्रीट येथील खजुरवाला चेंबर्समधीलमेसर्स मोहम्मद इस्माईल चोहान या आस्थापनेवर छापा टाकला होता.