लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : आई मद्यधुंद अवस्थेत असताना पित्याने १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार मुंबईत घडला. पीडित मुलीने हा प्रकार मावशीला सांगितल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी पीडित मुलीच्या वडिलांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
young woman abandoned her newborn near Vanzra Layout Nagpur
अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला रस्त्यावर फेकले
Malkapur court sentenced accused to life imprisonment for sexually abusing minor girl and getting her pregnant
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादले ; आरोपीस जन्मठेप , डीएनए चाचणी निर्णायक
Gashmeer Mahajani
“…तरच मूल होऊ द्या”, पालकत्वाविषयी स्पष्टच बोलला गश्मीर महाजनी; म्हणाला, “तुम्ही आई-वडील म्हणून कैद…”
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी
school girl and her brother molested by minors who threatened to kill her
जिवे मारण्याची धमकी देऊन शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य, अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल
senior citizen cheated , Crime case against cyber thieves,
पुणे : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा

मुंबईमधील पश्चिम उपनगरात कुटुंबासमवेत वास्तव्यास असलेल्या १३ वर्षांच्या मुलीवर वडिलांनीच २७ जुलै रोजी अत्याचार केला. आरोपीने पत्नीला दारू पाजली. दारू सेवनामुळे तिची शुद्ध हरपली. त्यानंतर पित्याने पीडित मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर आरोपीने पीडित मुलीला हा प्रकार कोणालाही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मुलगी घाबरली होती. पण पीडित मुलीने काही दिवसानंतर तिच्या मावशीला घडलेला प्रकार सांगितला.

आणखी वाचा- मतदान केंद्रांच्या संख्येत वाढ होणार; हजार-बाराशे मतदारांमागे एक मतदान केंद्र

मावशीने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्सो) आरोपी पित्याविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Story img Loader