गेल्या सहा दिवसांत मुंबई आणि परिसरातून सुमारे ४५० बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली. या कारवाईमुळे मुंबईतून चालू वर्षांत अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी घुसखोरांची संख्या १३०० झाली आहे.
विशेष शाखेच्या अंतर्गत असलेल्या ‘आय’ शाखेने १ डिसेंबर रोजी ५७ बांगलादेशींना अटक केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून ठाणे ग्रामीण आणि नवी मुंबई परिसरात बांगलादेशी बेकायदा राहात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नालासोपारा, भाईंदर तसेच खारघर, कामोठे आणि घणसोली या परिसरात छापे घालून ३८८ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली. त्यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. यातील बहुतांश मजूर आहेत.
चालू वर्षांत आय शाखेने धडक कारवाई करून अटकेत घेतलेल्या बांगलादेशी घुसखोरांपैकी २५० जणांना परत त्यांच्या मायदेशी पाठविण्यात आले असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितल़े    

Story img Loader