मुंबई: नाताळ आणि नववर्षाच्या सुट्टीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढते आहे. अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी पनवेल ते मडगाव दरम्यान १४ नाताळ/नवीन वर्ष विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. २२ डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत या गाड्या धावतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गाडी क्रमांक ०१४२७ पनवेल – मडगाव २२ ते ३१ डिसेंबरपर्यंत (६ फेऱ्या) दर शुक्रवार, शनिवार आणि रविवारी रात्री ९.१० वाजता पनवेल येथून सुटेल आणि मडगाव जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.५० वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१४२८ मडगाव – पनवेल

२२ ते ३१ डिसेंबरपर्यंत (६ फेऱ्या) दर शुक्रवारी, शनिवार आणि रविवारी सकाळी ८ वाजता सुटेल आणि रात्री ८.१५ वाजता पनवेल येथे पोहोचेल. या रेल्वेगाडीला रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी या स्थानकात थांबा असेल. ही रेल्वेगाडी २२ डब्यांची असून ६ वातानुकूलित तृतीय डबे, ४ शयनयान, १२ सामान्य द्वितीय श्रेणी गार्ड्स ब्रेक व्हॅन असणार आहेत.

हेही वाचा… ठाण्यात लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान; समृद्धी महामार्गाजवळील ५० एकर जागा भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा

गाडी क्रमांक ०१४३० मडगाव – पनवेल नववर्ष विशेष रेल्वेगाडी मडगाव येथून १ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता (एक फेरी) सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ७.२० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४२९ पनवेल – मडगाव नववर्ष विशेष रेल्वेगाडी पनवेल येथून २ जानेवारी रोजी सकाळी ८.२० वाजता सुटेल (एक फेरी) आणि मडगाव येथे रात्री ९.३० वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी या स्थानकात थांबा असेल. ही गाडी २२ डब्यांची असून ६ वातानुकूलित तृतीय डबे, ४ शयनयान, १२ सामान्य द्वितीय श्रेणी गार्ड्स ब्रेक व्हॅन असणार आहेत. या चारही रेल्वेगाड्यांचे आरक्षण लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.