पोलीस अधिका-यास केलेल्या मारहाण प्रकरणातील निलंबित आमदार क्षितीज ठाकूर आणि राम कदम यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. विधान भवनात मंगळवारी पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना ठाकूर आणि कदम यांच्यासह १५ आमदारांनी मारहाण केली होती. सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीत ठाकूर आणि कदम यांना ओळखले होते. त्यावरून या दोघांना अटक करण्यात आली. काल (गुरूवार) सकाळी या दोघांचे जबाब नोंदविल्यानंतर त्यांना गुन्हे शाखा १ ने अटक केली. आमदार क्षितीज ठाकूर आणि राम कदम यांच्या जामीनासाठीच्या अर्जावर सोमवारी निर्णय होणार आहे.

Story img Loader