लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : गणेत्सवकाळात गणेश भक्तांसाठी मध्य आणि कोकण रेल्वे खेड – सीएसएमटी, खेड – पनवेल दरम्यान १४ अनारक्षित गणपती विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. या रेल्वेगाड्यांमुळे कोकणातून परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Municipal employees sealing a property in Kalyan East
कल्याण पूर्वेत थकबाकीदारांच्या मालमत्तांना टाळे
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
mmrda acquire farmers lands in 124 villages of uran panvel and pen for third mumbai
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांची एकजूट; उरण, पनवेलमधील १२४ गावे संपादित करण्याची अधिसूचना
Special trains for Konkan and Goa on year end and long weekend
कोकण, गोव्यासाठी विशेष रेल्वेगाड्या
land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
insurance scheme mango, cashew insurance,
विमा योजनेत जाचक अटी घालून कोकणातील आंबा – काजू बागायतदारांवर अन्याय
pune municipality suffered financial loss due to state government decision
Pune Municipal Corporation : महापालिकेला का सोसवेना समाविष्ट गावांचा भार, काय आहे नक्की कारण?
Satara Child marriage, delivery of minor girls Satara ,
सातारा : अल्पवयीन मुलींच्या प्रसूतीमुळे बालविवाह उघड, विवाहित अल्पवयीन मुलींच्या पतींवर गुन्हे दाखल

गाडी क्रमांक ०१०६९ अनारक्षित विशेष सीएसएमटी येथून १२ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० वाजता सुटेल आणि खेड येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ५.१५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१०७० अनारक्षित विशेष खेड येथून १६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी आणि कळंबणी बुद्रुक येथे थांबा देण्यात येणार आहे.

आणखी वाचा- नऊ वर्षांनी एसटी महामंडळ नफ्यात

गाडी क्रमांक ०१०७१ अनारक्षित विशेष पनवेल येथून १३, १४, १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुटेल आणि खेड येथे त्याच दिवशी दुपारी २.४५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१०७२ अनारक्षित विशेष १३, १४, १५ सप्टेंबर रोजी दुपारी ३.१५ वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी रात्री ८.३० वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी आणि कळंबणी बुद्रुक येथे थांबा देण्यात येणार आहे.

गाडी क्रमांक ०१०७३ अनारक्षित विशेष पनवेल येथून १३, १४ आणि १५ सप्टेंबर रोजी रात्री ९.१० वाजता सुटेल आणि खेड येथे दुसऱ्या दिवशी रात्री १ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१०७४ अनारक्षित विशेष १३, १४, १५ सप्टेंबर रोजी खेड येथून सकाळी ६ वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी सकाळी १० वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी आणि कळंबणी बुद्रुक येथे थांबा देण्यात येणार आहे. या सर्व रेल्वेगाड्या अनारक्षित म्हणून चालणार असून अतिजलद मेल/एक्स्प्रेस गाड्यांसाठी लागू असलेल्या सामान्य शुल्कासह रेल्वेगाडी सुटण्यापूर्वी यूटीएस प्रणालीद्वारे आरक्षित केल्या जातील, अशी माहिती मध्य आणि कोकण रेल्वेकडून देण्यात आली.

Story img Loader