लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मोठ्या संख्येने अनुयायी मुंबईतील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येत असतात. ही बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वेने महापरिनिर्वाण दिनानिमित्त १४ विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर – सीएसएमटी विशेष तीन, सीएसएमटी /दादर – सेवाग्राम/अजनी/नागपूर विशेष सहा, कलबुर्गी – सीएसएमटी विशेष दोन, सोलापूर – सीएसएमटी विशेष दोन आणि अजनी – सीएसएमटी एक रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे.

गाडी क्रमांक ०१२६२ नागपूर येथून ४ डिसेंबर रोजी रात्री ११.५५ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी दुपारी ३.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२६४ नागपूर येथून ५ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे रात्री ११.४५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२६६ नागपूर येथून ५ डिसेंबर रोजी दुपारी ३.५० वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १०.५५ वाजता पोहोचेल.

आणखी वाचा-मराठी पाट्या नसणाऱ्या दुकानांवर मुंबई महापालिका उगारणार कारवाईचा बडगा

गाडी क्रमांक ०१२४९ सीएसएमटी येथून ६ डिसेंबर रोजी दुपारी ४.४५ वाजता सुटेल आणि अजनी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२५१ सीएसएमटी येथून ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३५ वाजता सुटेल आणि सेवाग्राम येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२५३ दादर येथून ७ डिसेंबर रोजी रात्री १२.४० वाजता सुटेल आणि अजनी येथे दुपारी ३.५५ वाजता पोहचेल. गाडी क्रमांक ०१२५५ सीएसएमटी येथून ७ डिसेंबर रोजी दुपारी १२.३५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे रात्री ३ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२५७ सीएसएमटी येथून ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १२.१० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२५९ दादर येथून ८ डिसेंबर रोजी रात्री १२.४० वाजता सुटेल आणि अजनी येथे दुपारी ३.५५ वाजता पोहोचेल. यासह कलबुर्गी – सीएसएमटी दोन, सोलापूर – सीएसएमटी दोन, अजनी – सीएसएमटी वन-वे अतिजलद अनारक्षित विशेष एक रेल्वेगाडी चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. तसेच ६ डिसेंबर रोजी सोडण्यात येणाऱ्या गाडी क्रमांक ११४०१ सीएसएमटी – आदिलाबाद एक्स्प्रेसला एक सामान्य द्वितीय श्रेणी डबा वाढवण्यात येणार आहे, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 14 special trains on the occasion of mahaparinirvana day mumbai print news mrj