मुंबई : कांदिवली येथील एका नाल्यात १४ भटक्या कुत्र्यांचे मृतदेह गोणीत भरून फेकलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. साईनगर परिसरातील एका नाल्यात शनिवारी काही पोती स्थानिकांना आढळून आली. याची माहिती पोलिसांना देण्यात आली.

पोलिसांनी तपास केला असता या गोण्यांमध्ये १४ भटक्या कुत्र्यांचे मृतदेह सापडले. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि प्राणी क्रूरता प्रतिबंध कायद्यातील तरतुदींनुसार अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यासंबंधीची एक चित्रफीतही समाजमाध्यमांमध्ये प्रसृत झाली आहे. मृत कुत्र्यांचे मंगळवारी शवविच्छेदन करण्यात येणार आहे. देशात गेल्या काही वर्षांत प्राण्यांबाबत क्रूरतेच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कुत्रे, कुत्र्यांची पिल्ले आणि मांजर यांना जिवंत जाळण्यात आल्याच्याही अनेक घटना समोर आल्या आहे.

mauled dog in Chikhli bitten many causing fear among residents
चिखलीत पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस; ३० जणांना चावा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Golden fox and stray dogs coexist in Kharghar Mumbai print news
खारघरमध्ये सोनेरी कोल्हा आणि भटक्या कुत्र्यांचा एकत्र वावर
In Khambhadi Koturli village Bhandara district sighting of tiger in broad daylight has created excitement among the villagers
भंडारा : वाघाला चक्क गावकऱ्यांनीच घेरले अन…
Citizens of Gondia and state experienced thrill of tigers in Navegaon Nagjira forest
नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघिणीच्या छाव्यांचा खेळ
attack by a wild dog on a deer
‘शेवटी मरण चुकवता येत नाही…’ हरणावर जंगली कुत्र्याचा क्रूर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
career animal love
चौकट मोडताना : प्राणिप्रेमाची धास्ती
gadhimai festival in nepal animal slaughtered
‘या’ उत्सवात दिला जातो हजारो जनावरांचा बळी; काय आहे गढीमाई उत्सव? याला जगातील सर्वांत रक्तरंजित उत्सव का म्हटले जाते?
Story img Loader