चांगला परतावा देण्याचे आमीष दाखवून १४७ गुंतवणूकदारांची सुमारे १७ कोटी ९४ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आयात – निर्यात करणाऱ्या कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी व्यावसायिकाने गुंतवणूकदारांना प्रति महिना ७ ते १० टक्के व्याज देण्याचे आमीष दाखवून गुंतवणूक करण्यास सांगितले. आरोपीने गुंतवणूकदारांना सुरुवातीला व्याज दिले, पण नंतर पैसे बुडवले, असा आरोप आहे. १४७ गुंतवणूकदारांनी आतापर्यंत पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यांची एकूण १७ कोटी ९४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. येत्या काही दिवसांत पीडित गुंतवणूकदारांची संख्या वाढू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Thane Anti Corruption Bureau arrested senior clerk for demanding two percent to clear dues
लाचेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक अटकेत
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
77 lakh fraud by cyber thieves, lure of investment ,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून ७७ लाखांची फसवणूक
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Mumbai ED filed supplementary charge sheet against OctaFX and other related entities
ऑक्टाएफएक्स प्रकरण : ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल, देशातील व्यवहारांतून ८०० कोटी जमा केल्याचा आरोप
chhatrapati Sambhajinagar sports complex scam
१३ हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याने घातला २१ कोटींचा गंडा; प्रेयसीला दिला ४ बीएचकेचा फ्लॅट, स्वतः घेतल्या आलिशान गाड्या

हेही वाचा >>> “काँग्रेस लुट की दुकान, झुठ का बाजार हैं”, मोदींच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले, “त्यांनी चुकीने…”

या प्रकरणातील तक्रारदार डॉ. राजीव शर्मा (४५) स्त्रीरोगतज्ज्ञ असून ॲन्टॉप हिल फर्टिलिटी ॲण्ड हेल्थ केअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत. डिसेंबर २०२१ मध्ये आरोपी वेंकटरामनन गोपालने एका इंग्रजी वृत्तपत्रामध्ये गुंतवणूक योजनेबाबत जाहिरात दिली होती. ती वाचून शर्मा यांनी जाहिरातीत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला.

मूळचे चेन्नईतील रहिवासी असलेले गोपालन यांनी आपण जीव्हीआर आयात व निर्यात कंपनीचे मालक असल्याचे सांगितले होते. त्या कंपनीचे कार्यालय मुंबईतील सांताक्रूझ (पूर्व) येथे असून गेल्या पाच वर्षांपासून कंपनी सिंगापूर, दुबई, मलेशिया सांरख्या देशांमध्ये फळे, भाज्या, सुका मेवा, मसाल्यांची आयात – निर्यातीचा व्यवसाय करीत असल्याचे तक्रारदारांना सांगण्यात आले होते.

हेही वाचा >>> मुंबई : चुनाभट्टी येथे सिमेंट मिक्सर टँकरची पाच वाहनांना धडक, पाच ते सहाजण गंभीर जखमी

तक्रारीनुसार, आरोपीने डॉक्टर शर्मा आणि त्यांच्या आईला त्यांच्या कंपनीत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. त्यांच्या व्यवसायाच्या योजना समजावून सांगताना एक वर्षासाठी १० लाख रुपये जमा केले तर त्या बदल्यात त्यांना दरमहा ७० हजार रुपये व्याज मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले. गोपालनच्या सांताक्रूझ (पूर्व) कार्यालयाला भेट दिल्यानंतर आणि त्यांची ओळखपत्रे तपासल्यानंतर डॉ. शर्मा आणि त्यांच्या आईने योजनेत गुंतवणूक करण्याचे मान्य केले. पुढे त्यांचा विश्वास बसल्यानंतर त्यांनी २०२२ मध्ये गोपालनच्या कंपनीत ७६ लाख रुपयांची गुंतवणूक केली व त्याबाबत कागदोपत्री करारही केला. तक्रारदारांना जानेवारी ते डिसेंबर २०२२ या कालावधीत व्याजाची रक्कम देण्यात आली. त्यानंतर रक्कम येणे बंद झाले. शर्मा यांच्याप्रमाणे इतर गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर अनेक गुंतवणूकदारांनी एकत्र येऊन पोलिसात तक्रार दाखल केली. वाकोला पोलीस ठाण्यात शुक्रवारी याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर पुढील तपासासाठी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. गोपालनविरोधात याप्रकरणी फसवणूक व फौजदारी विश्वासघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Story img Loader